अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची अधिवेशन नियोजन बैठक उत्साहात.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची अधिवेशन नियोजन बैठक उत्साहात.
ब्यूरो रीपोर्ट - प्रवीण पाटील.
अमरावती येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने 5 डिसेंबर 2021 रोजी पत्रकारांचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे त्या अनुषंगाने हाॅटेल प्राईम पार्क येथे शनिवार दि 23 रोजी विशेष बैठक पार पडली. यात संघटनेच्या राज्यातील केंद्रीय पदाधिकारी सह विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मधील संघटना प्रमुख व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहरजी सुने तर प्रमुख अतिथी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास बापु देशमुख होते.. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाला 25 वर्षे पूर्ण झाली त्या अनुषंगाने संघाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा आढावा हा स्मरणिकेचे माध्यमातून घेतला जाणार आहे त्या साठी संघाच्या वतीने भरारी स्मरणिकेचे प्रकाशन व कार्यालयीन दिनदर्शिका नियोजनाची माहिती या बैठकीत देण्यात आली. या बैठकीस केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे केंद्रीय सचिव अशोक पवार, या सह पत्रकार संघाचे विविध जिल्ह्यातून आलेले जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment