भूमीपूजन समारंभ संपन्न.
जि. प. सदस्या सौ. आशाताई झिमुर यांचे हस्ते भूमीपूजन समारंभ संपन्न.
शिराळा - प्रतिनिधी.
वाकुर्डे मतदार संघातील घागरेवाडी येथे गेली ३० वर्ष स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित होता. जि. प. सदस्या सौ. आशाताई विजय झिमुर यांच्या अथक प्रयत्नाने तो योजनेतून पूर्ण होणार आहे. याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. या कामाचे भूमीपूजन जि.प सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. उषा गागरे, उपसरपंच सौ. लक्ष्मी घागरे, ग्रा. सदस्य मारूती घागरे, वैजयंता खोचरे, राजू पाटील, मनस्वी ग्रुपचे सूर्यकांत गायकवाड, रोहीत झिमुर व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment