ग्रामसभा" सूत्रधाराच्या" मर्जीवर.. सरपंच ,सदस्य फक्त नावापुरतेच..?

 ग्रामसभा" सूत्रधाराच्या" मर्जीवर.. सरपंच ,सदस्य फक्त नावापुरतेच..?

 ग्रामस्थांची ग्रामसभेकडे पाठ.. चांगल्या कामाच्या अपेक्षा दिल्या सोडुन..?

   उंडाळे - पी.डी. पाटिल.(गोंडवाना न्युज.)

    ग्रामसभा ही खऱ्या अर्थाने लोकशाही संस्था आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायतीच्या कारभार अधिक पारदर्शक व्हावा, तळागाळातील लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहचावा म्हणून, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ७ अ अन्वये प्रत्येक गावासाठी एक ग्रामसभा अस्तित्वात आली. ग्रामसभेच्या सदस्यांनी एकत्र यावे. लोकांच्या गरजा काय आहेत त्या ग्रामपंचायतीला सांगाव्यात आणि गावांच्या भल्यासाठी कोणत्या योजना अगोदर घ्याव्यात हे सुचवावे. ग्रामपंचायतीला सल्ला दयावा आणि मार्गदर्शन करावे. थोडक्यात सांगावयाचे तर ग्रामसभेच्या सदस्यांनी गावांच्या विकासात सहभागी व्हावे. याशिवाय ग्रामसभेने, ग्रामपंचायतीने वर्षभरात गावांच्या विकासाची जी कामे केली असतील त्यांची माहिती व आढावा घ्यावा. ग्रामपंचायतीने पुढील वर्षी विकासाची जी कामे करावयची ठरविले असेल त्यांची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने वर्षभर केलेल्या खर्चाचा हिशोब घ्यावा आणि पुढील वर्षी किती खर्च केला जाणार आहे त्याची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने हिशोब तपासताना हिशोब तपासणाऱ्या अधिकाऱ्याला ज्या शंका आल्या असतील त्या शंका जाणून घ्याव्यात आणि त्या शंकांना ग्रामपंचायतीने जी उत्तरे दिली असतील ती उत्तरे समजून घ्यावीत. ग्रामपंचायत करीत असलेल्या कारभाराची प्रश्न विचारून माहिती घ्यावी आणि ग्रामपंचायतीला सूचना कराव्यात. म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामसभेने नियंत्रण ठेवावे आणि ग्रामपंचायतीवर निवडून दिलेल्या सदस्यांनी चांगली कामे केली तर प्रोत्साहन दयावे व त्यांच्याकडून कामे नीट होत नसतील तर त्यांना जाब विचारावा अशी अपेक्षा असते, मात्र  याला अपवाद दिसुन येत आहे,  सरपंच गावातील ग्रामस्थांना विचारात न घेता"सुत्रधाराच्या" विचाराने सर्वसामान्याच्या अधिकारावर "गदा" आणत आपला कारभार हक्कण्यात गर्क दिसुन येत आहेत.

  ग्रामस्थांना आपल्या ग्रामपंचायतीध्ये कोण-कोणती विकासकामे झाली आहेत, कोणती विकासकामे होणार आहेत, याच विविध योजनाची माहिती मिळावी यासाठी सार्वजनिक सुट्टि दिवशी "ग्रामसभा"आयोजित करण्यात याव्यात आपले प्रश्न, सुचना मांडुन स्वच्छ पारदर्शक कारभार ग्रामपंचायत व सदस्याकडुन व्हावा अशी  अपेक्षा ग्रामस्थांना राहते, पण सार्वजनिक सुट्टिवेळी ग्रामसभेस भरपुर लोक गोळा होतील आणि  त्या वेळेला ग्रामस्थांनी जर आपल्या हक्क अधिकराविषयी जर विचारणा केली तर त्यांना उत्तरं देणं कठीण होतं    असा गैरसमज करुन घेत  ग्रामसभा जाणिवपुर्वक कमी लोक असताना घेण्यात येत असते.

ग्रामस्थाच्या अनुउपस्थित घेण्यात येण्या-या ग्रामसभेमुळे "ग्रामस्थांनी ही त्याच्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र  पहावयास मिळत आहे.

ग्रामसभेत शक्यतो गावचा विकास, विविध योजना या अनुशंगाने घेण्यात येतात ,मात्र त्याला अपवाद ठरु पाहणारी ग्रामसभा सध्या मध्ये होताना दिसुन येत आहे, यामध्ये सरपंच, सदस्य व  ग्रामसेवक यांचा कारभार ग्रामपंचायत अधिनियमा ऐवजी त्रयस्त व्यक्तीच्या मर्जीवर, वैयक्तीक मतावर, हेवेदाव्यावर चालत असुन ग्रामस्थासाठी , समाजासाठी घातक ठरु शकतो.तर ग्रामस्थाच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी नेमणुक करण्यात आलेले ग्रामपंचायतीचे सचिव आपल्या कार्यालयीन वेळेत गैरहजर राहत ,असुन त्यांचा कारभार ग्रामपंचायतीच्या शिपायांकरवी होताना दिसुन येत आहे. संबंधित ग्राम सचिवांची  वेळोवेळो तक्रार करुनही वरिष्ठामार्फत ही याकडे"कानाडोळा" करत दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवक समविचाराचा अभाव, ग्रामस्थांच्या मुळावर..


ग्रामविकास अधिकारी साहेबांचा  कामचुकारपणा व कर्तव्यात कसूर  ठरतं आहे डोकेदु:खी.. 


ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव,  या नात्याने ओळखले जाते, गावचे दप्तर सांभाळणे, अंदाजपत्रक, आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण, शासकीय योजना आदीसह इतर कामाचे नियोजन व ती पुर्नत्वास नेण्यासाठी कंटिबंध असतानाही हे महाशय स्थानिक राजकारणात"रस"घेत "ह्याला गाड, त्याला गाड" अडकून पडलेले असतात, तर बराच वेळीस कार्यालयीन कामाचा आडोसा घेत कामाच्या ठिकाणी गैरहजर राहत असल्याने ग्रामस्थाची डोकेदु:खीतखीत वाढ झाली आहे. 


सरपंच, ग्रामसेवकांचे विविध कागदपत्राकडे दुर्लक्ष..


ग्रामपंचायत मध्ये आवक-जावक होण्या-या दप्तराची देखरेख ठेवण्याची जबाबदारी ग्राम सचिवाची असुन त्यांच्या दरबारातील कार्यालयीन कामकाजाची माहिती मिळावी यासाठी अर्जाची जागा त्यांच्या वतीने "कचरा कुंडीचं" दाखवण्यात येत असुन आलेल्या विनंती वजा अर्जाची साधी दखल घेण्याची तसदी सरपंचाकडुन होत नसल्याची खंत ग्रामस्थातुन बोलली जाते आहे.

कार्यालयीन 
निर्णयप्रक्रियेत"अज्ञात"व्यक्तीचा प्रभाव, सरपंच, सदस्य फक्त नावापुरतेचं..


गावचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी ही सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची असते, मात्र ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य हे फक्त नावापुरतेचं दिसुन येत असुन "गटारातील घाण काढण्याचं टेंड्रर, पासुन कोणत्या कामाचा ठेका कुणाला द्यायचा  गावातील एका"अज्ञात" व्यक्ती कडुन ठरवण्यात येत असुन त्यानुसार निर्णय घेवुन गावचा कारभार हक्कण्याकडे कल सध्या सरपंच व सदस्यांचा दिसुन येतोय.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .