जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात संपन्न .

 

कृषी संशोधनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : डॉ. सुरेश भोसले.

जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात.


कराड - प्रतिनिधि.
 जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय हे कृषी संशोधनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील असून, येत्या काळात त्यादृष्टीने महाविद्यालयात स्वतंत्र संशोधन विभाग सुरू करण्याचा आमचा मनोदय आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कृष्णा कृषी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

          व्यासपीठावर कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, प्राचार्य डॉ. भास्करराव जाधव, प्रा. आर. डी. पवार होते. याप्रसंगी कृष्णा कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना डॉ. भोसले यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच प्रथम क्रमांक विजेत्या अंकिता शेळके या विद्यार्थीनीला सुवर्णपदक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी डॉ. भोसले म्हणाले, की कृष्णा कारखान्याने कृषी महाविद्यालयाची स्थापना करून सहकार क्षेत्रात एक नवा पायंडा घातला. या कृषी महाविद्यालयामुळे भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळाला. शेतीक्षेत्रात झपाट्याने बदल होत असून, नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष शेतीत व्हावा, यासाठी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसोबत शेतीत नवे प्रयोग करावेत. नव्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करताना, भविष्यात आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्याची गरज आहे. तसेच येत्या काळात कृषीविषयक विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम, पीएच.डी. अभ्यासक्रम तसेच कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत महाविद्यालयाने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रा. डॉ. भास्करराव जाधव यांनी स्वागत व प्रास्तविक केले. प्रा. डॉ. अजित पवार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, जे. डी. मोरे, सयाजी यादव, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, पं. स. सदस्य बाळासाहेब निकम, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील, हेमंत धर्मे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.


 



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .