मलकापुरात कवचकुंडल अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद.
मलकापुरात कवचकुंडल अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद.
मलकापुर नगरपरिषदेची लसीकरण मोहिमेत आघाडी.८०% नागरिकांचे लसीकरण पूर्ण.
मलकापुर - प्रतिनिधि.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मलकापुर नगरपरिषदेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या मिशन कवचकुंडल अभियानाला शहरवासियांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. मलकापुर नगरपरिषद व आरोग्यविभाग यांच्यावतीने प्रभाग निहाय लसीकरण मोहिम राबवण्यात येत असुन. ज्यांनी आज पर्यंत कोरोनाप्रतिबंधक लस घेतलेली नाही अशा नागरिकांची यादी तयार करुन प्रत्येक प्रभागातील नोडल अधिकारी आरोग्यसेविका यांच्यावतीने सर्वे करुन संबधीत प्रभागामध्ये विशेष अभियान राबवण्यात येत आहे. मलकापुर शहरामध्ये कोरोनारुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चिञ आहे. शहरामध्ये झालेल्या उच्चांकी लसीकरणाचा परिणाम समाधानकारक असा असल्याने यावर पूर्ण नियंञण मिळवण्यासाठी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून शहराच्या प्रभागातील प्रत्येक काॅलन्यांमध्ये हे अभियान राबवले जात आहे. वयोवृध्द नागरिकांना घरामध्ये जाऊन लसीकरण करण्यात न.प.कर्मचारी आरोग्यसेवक आघाडीवर आहेत. या अभियानाचा भाग म्हणून मोबाईल व्हॅनद्वारे प्रभाग क्र ४ मधील लाहोटीनगर, जयहिंद प्राईड , हौसाई कन्या शाळा परिसर, कोल्हापुर नाका या विभागात आज लसीकरण करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख, म.न.सेचे दादा शिंगण, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, मलकापुर नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक ज्ञानदेव साळुंखे, नोडल अधिकारी रामभाऊ शिंदे, यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी डाॅ. देसाई , आरोग्य सेवक सुभाष बागल, सुनिल शिंदे, पंकज बागल , विकी पाचपुते, आरोग्य सेविका सौ.पावणे, सौ.सोनवले, यांच्यासह मलकापुर नगरपरिषदेच्या कर्मचार्यांनी या अभियानामध्ये सहभाग घेतला. दरम्यान २०४ नागरिकांचे लसीकरण आज करण्यात आले. शहरातील नागरिकांचे १००% लसीकरण पूर्ण करण्याचे नगरपरिषदेचे मुख्य उद्दीष्ट्य असल्याचे मुख्याधिकारी राहूल मर्ढेकर यांनी सांगत जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकार्यांनी यावेळी केले आहे.
Comments
Post a Comment