आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते 'कोरोना योध्दा सन्मान' सोहळा संपन्न.

आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते  'कोरोना योध्दा सन्मान'   सोहळा  संपन्न.

कासेगाव - प्रतिनिधि.(उमेश कांबळे.)

 शिराळा  येथील पोलिस ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत तालुक्यातील सर्व पोलीस पाटीलांचा कोरोना योध्दा सन्मान व पोलीस ठाण्याच्या आवारात दहा लाख खर्च करून बसवलेल्या दोन हायमास्ट पोलचे उदघाटन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी  श्री. पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार नाईक म्हणाले,

 "कोरोनाच्या कठीण परिस्थतीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य जबाबदारीने पार पडले, त्या सर्व घटकांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे. तुम्हीं समाजातील लोकांसाठी करीत असलेले सेवाकार्य अतुलनिय आहे."

 राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे यांनी स्वागत केले. पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पिंगळे, पोलीस निरीक्षक श्री. चिल्लावार, महिला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष साधना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विश्वासचे संचालक विश्वास कदम, नगराध्यक्ष सुनीता निकम, गट विकास अधिकारी संतोष राऊत, नायब तहसीलदार अशोक कोकाटे, कोकरूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक जी. पी. लोहार, पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हर्षद माने, नगरसेवक मोहन जिरंगे, पृथ्वीसिंग नाईक, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जाधव, उपाध्यक्ष संजय परीट, महिला उपाध्यक्ष अनिता पाटील, राजसिंग पाटील, राजू निकम, अजय जाधव, सागर नलवडे आदी मान्यवर, तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, पोलीस, आदी उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .