इन्स्पायर अवॉर्ड नामांकन मध्ये सातारा जिल्हा महाराष्ट्रमध्ये विभागात प्रथम.

 इन्स्पायर अवॉर्ड नामांकन मध्ये सातारा जिल्हा महाराष्ट्रमध्ये विभागात प्रथम.



कराड प्रतिनिधी:- प्रवीण पाटील

इन्स्पायर अवॉर्ड योजना 2021- 2022 मध्ये विद्यार्थी नोंदणी साठी सातारा जिल्हा महाराष्ट्र मध्ये तिसरा तर सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच विभागात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्वात जास्त विद्यार्थी नोंदणी एकूण 2170 एवढी झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त कराड तालुक्यात 435 झाली आहे. जावळी तालुक्यात 138, खटाव 153, कोरेगाव 150 महाबळेश्वर 232,माण 114, फलटण 138, सातारा 285, वाई 132, पाटण 285 तर सर्वात कमी खंडाळा तालुक्यात 108 एवढी झाली आहे.

याचबरोबर सातारा जिल्ह्यात 2170, सांगली 1328, कोल्हापूर 1198, रत्नागिरी 693, सिंधुदुर्ग 137 एवढी या जिल्ह्यात विद्यार्थी नोंदणी इन्स्पायर अवॉर्ड 2021- 2022 मध्ये झाली असल्याची माहिती जिल्हा समन्वयक लक्ष्मण उबाळे श्री कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोवे यांनी दिली आहे.

तसेच शिक्षण विस्तार अधिकारी विज्ञान पर्यवेक्षिका मंगल मोरे मॅडम जिल्हा परिषद सातारा यांनी विद्यार्थी नोंदणीसाठी विशेष प्रयत्न केले. यामध्ये त्यांनी प्रत्येक तालुक्यातील शाळेचे मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक यांना झूम मीटिंग आयोजित करून सर्वांना ऑनलाइन मार्गदर्शन केल्यामुळे सातारा जिल्ह्याचे सर्वात जास्त नामांकन होण्यास मदत झाली आहे.

जिल्हा समन्वयक लक्ष्मण उबाळे श्री. कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोवे यांनी ऑनलाइन विद्यार्थी नोंदणी करत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवणे व जास्तीत जास्त शाळेतील विद्यार्थ्यांचा इन्स्पायर अवॉर्ड मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी ऑनलाइन मार्गदर्शन केले.

त्याचबरोबर विद्यार्थी नोंदणीच्या कामांमध्ये शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग प्रभावती कोळीकर मॅडम, शिक्षण अधिकारी प्राथमिक विभाग चोपडे साहेब सर्व तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी व केंद्रप्रमुख तसेच घोडके मॅडम, प्रमोद रांजणे, त्रिंबके सर, विष्णू ढेबे,सचिन पंडित सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूरचे संचालक रमतकर साहेब, राजू नेब सर तसेच नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन च्या प्रियांका खोले मॅडम या सर्वांनी सातारा जिल्ह्याचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .