डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे सर यांनी डॉ.संदीप कांबळे यांची घेतली सदिच्छा भेट .

    डेमोक्रेटिक  पार्टी ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे सर यांनी  डॉ.संदीप कांबळे यांची घेतली सदिच्छा भेट .


समतानगर नाटोली : प्रा.सुकुमार कांबळे सर, डॉ.संदीप कांबळे,व इतर. 

 कासेगाव - प्रतिनिधि (उमेश कांबळे.)

                    डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे सर यांनी संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.संदीप कांबळे यांची सदिच्छा भेट घेतली. शिराळा तालुक्यातील दलित समाजातील वेगवेगळ्या समस्या व अडचणीवर कशा पद्धतीने मात करता येईल याविषयी सखोल चर्चा करण्यात आली. प्रा.सुकुमार कांबळे सरांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून संघटन कसे मजबूत होईल या विषयावर भाष्य केले.यावेळी डॉ.संदीप कांबळे यांनी सरांच्या विचारांना पाठिंबा देत भविष्यकाळात संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र आपल्या खांद्याला खांदा लावून ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल तिथे आम्ही आपल्या सोबतच असू असे अभिवचन दिले. यावेळी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष मा.नंदकुमार नांगरे ,पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मा. सतीश लोंढे ,वाळवा तालुका युवा अध्यक्ष मा. प्रवीण वारे तसेच मा. शशिकांत चव्हाण शिराळा तालुका अध्यक्ष संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र , मा.शंकर कांबळे सचिव संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र ,महिला आघाडी राज्य अध्यक्ष मा.अर्चना कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .