शिराळा तालुका प्रवासी संघामार्फत शिराळा रा. प. आगार व्यवस्थापकांना निवेदन.


शिराळा तालुका प्रवासी संघामार्फत  शिराळा रा. प. आगार व्यवस्थापकांना  निवेदन.


शिराळा - प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे.)

शिराळा तालुक्यातील मुंबईकर तसेच स्थानिक प्रवाशांच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन, शिराळा रा. प. आगार व्यवस्थापिका श्रीमती विद्या कदम यांना सादर करण्यात आले. शिराळा तालुका प्रवासी संघामार्फत देण्यात आलेल्या या निवेदनामध्ये, एसटी महामंडळाच्या प्रचलित वाहतूक व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल होण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. 

सर्व सोयींनी युक्त अशा आरामदायक गाड्या पुरविणे, एसटी रिझर्वेशनची प्रक्रिया अधिक सुलभ करणे, स्थानिक गाड्यांच्या फे-या वाढविणे तसेच एसटी वाहतुकीच्या वापर वाढण्याबाबत युध्दपातळीवर जनजागृती करणे अशा बहुविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. शिराळा रा. प. आगार प्रशासनाने शिराळा- पाडळी- अंत्री- शिरशी- वाकुर्डे- येळापूर- शेडगेवाडी फाटा- कराडमार्गे मुंबई गाडी सुरु करण्याबाबत, तसेच उपरोक्त मागण्यांच्या पुर्ततेबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. 

याप्रसंगी वाहतूक नियंत्रक सद्दाम मुल्ला, चालक- वाहक आणि प्रवासी उपस्थित होते. सदर निवेदनावर, प्रणव सुतार, उत्तम सटाले, ओंकार पाटील, प्रशांत मोरे, विश्वजित यादव, जयदीप सांगुळे, बजरंग गुरव, तुषार देसाई, अॅड. सागर घोलप, विनोद आलुगडे, दत्तात्रय देसाई, महेश माने, संग्राम देसाई, महादेव रोकडे, बाजीराव पाटील, शिवाजी कदम, महादेव माने, अक्षय क्षीरसागर, गजानन पाटील, विजय कांबळे, श्रीराम नांगरे- पाटील, पंकज साळुंखे, मारूती रोकडे, प्रसाद पाटील, सचिन करमाळे, अमोल पाटील, कैलास देसाई आदींच्या सह्या आहेत.



आजपर्यंत एसटी महामंडळाने सबंध शिराळा तालुक्याच्या तसेच महाराष्ट्र राज्याच्या विकासात, जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली आहे. आपल्या सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामकरी समाजाची जीवनवाहिनी असलेल्या, एसटीचे बळकटीकरण होऊन त्यायोगे आपल्या तालुक्यातील प्रवाशांना सोयी  मिळाल्या पाहिजेत. याकरिता संवाद, समन्वय, पाठपुरावा आणि गरज पडल्यास शासनदरबारी संघर्ष या सूत्रांवर सातत्याने प्रवासी संघ कार्यरत राहिल.

             -     पंकज साळुंखे, 

  समन्वयक- शिराळा तालुका प्रवासी संघ.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .