इन्स्पायर अवार्डची मुदत वाढ.
इन्स्पायर अवार्डची मुदत वाढ.
प्रतिनिधी - प्रवीण पाटील.
इन्स्पायर अवार्ड 2021 - 22 साठी होणाऱ्या प्रदर्शनाच्या विद्यार्थ्याचे नाव नोंदणीची मुदत वाढ 15 ऑक्टोबर पर्यंत होती. ती आता 24 ऑक्टोंबर पर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे.
इन्स्पायर अवार्ड 2021 - 22 विद्यार्थी नोंदणीमध्ये नेहमी प्रमाणे सातारा जिल्हा सर्वात अधिक अग्रेसर आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर या तीन विभागांमध्ये सातारा जिल्हा विभागात पहिला आहे. तर महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर नोंदणी मध्ये आहे. आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये इन्स्पायर अवॉर्डसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी 1131 एवढी झाली आहे. तसेच सर्वाधिक विद्यार्थ्यांची नोंदणी कराड, पाटण आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यातील शाळेमधील विद्यार्थ्यांची झाली आहे. अशी माहिती सातारा जिल्हा समन्वयक उबाळे एल.एच श्री कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोवे तालुका सातारा यांनी दिली आहे.
तसेच शिक्षण विस्तार अधिकारी विज्ञान पर्यवेक्षिका मंगल मोरे जिल्हा परिषद सातारा यांनी विद्यार्थी नॉमिनेशन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यामध्ये त्यांनी प्रत्येक तालुक्याच्या आढावा व मार्गदर्शन मिटिंग आयोजित करून जास्तीत जास्त शाळेचा सहभाग वाढवून विद्यार्थ्यांची नोंदणीसाठी प्रयत्न केला. त्याच बरोबर राहीलेल्या शाळेने मुदत पूर्वी इन्स्पायर अवार्डसाठी विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहन केले आहे .
Comments
Post a Comment