अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पदी अमोल साठे तर जिल्हा संघटक पदी संजय पाटील यांची निवड.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पदी अमोल साठे तर जिल्हा संघटक पदी संजय पाटील यांची निवड.
कराड - प्रतिनिधि,
कराड येथील शासकीय विश्रामगृहात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची सातारा जिल्ह्यातील कार्यकारिणी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती या वेळी या बैठकीस सदर निवडी जाहीर करण्यात आल्या या निवडी केंद्रीय अध्यक्ष मनोहरजी सुने, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापु देशमुख, केंद्रीय सचिव अशोक पवार केंद्रीय सरचिटणीस सुरेश सवळे, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे यांच्या आदेशानुसार निवडी ची घोषणा पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे यांनी केली या वेळी महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी बोलताना मंडले म्हणाल्या की गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील कार्यकारिणी ची नियुक्ती करण्यात आली नव्हती कारण राज्या वर कोरोना चे संकट होते आणि अजून सुद्धा आहे त्याच बरोबर फक्त पदा साठी काम न करता संघटना वाढी साठी चांगल्या व्यक्तींची निवड व्हावी म्हणून सातारा जिल्ह्यातील नियुक्तीस उशिरा झाला आता मात्र जिल्हाया ची यशस्वी घोडदौड कायम राहील अशी ग्वाही दिली. या वेळी नवीन कार्यकारिणी मध्ये सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पदी प्राध्यापक पैलवान NIS कोच अमोल साठे यांची तर दैनिक पुढारी चे वितरण विभाग प्रमुख संजय पाटील यांची सातारा जिल्हा संघटक पदी, डॉक्टर प्रकाश केसरकर कराड शहर संघटक, दिगंबर सुतार कराड तालुका कार्याध्यक्ष, प्रताप भणगे कराड दक्षिण वृत्तपत्र संघटक, तानाजी चव्हाण कराड दक्षिण कार्याध्यक्ष सामाजिक मंच, संकेत केसरकर सदस्य यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. नविन कार्यकारिणी चा सत्कार महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांचे हस्ते करण्यात आला.
Comments
Post a Comment