संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र व जय शिवराय किसान संघटना शिराळा तालुका दौरा यशस्वीरित्या संपन्न.
संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र व जय शिवराय किसान संघटना शिराळा तालुका संपर्क दौरा यशस्वीरित्या संपन्न.
शिराळा - प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे.)
शुक्रवार दिनांक 1/ 10 /2021 रोजी संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र व जय शिवराय किसान संघटना यांनी काढलेला संपर्क दौरा यशस्वी रित्या पार पडला. शिराळा तालुक्यातील प्रमुख गावातील संविधान प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना भेटून सर्वसामान्यांच्या अडचणी व शेतकऱ्यांच्या समस्या याविषयी सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी शिराळा तालुक्यातील संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्राचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. यावेळी संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्राचे संस्थापक /अध्यक्ष डॉ.संदीप कांबळे तसेच जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष मा.शिवाजी माने यांनी तालुक्यातील विविध समस्या जाणून घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. येणाऱ्या 11 ऑक्टोंबर रोजी वडगांव येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. शिराळा तालुक्यातील संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले असे मा.शिवाजी माने यांनी मत व्यक्त केले.
सामान्य माणसाच्या हक्कासाठी, अन्यायाविरुद्ध लढणारी जाज्वल संघटना
ReplyDelete