कृष्णा कारखान्यात पहिल्या ११ साखर पोत्यांचे पूजन.

 

कृष्णा कारखान्यात पहिल्या ११ साखर पोत्यांचे पूजन.


रेठरे बुद्रुक, ता. २९ : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२०२२ या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या पहिल्या ११ साखर पोत्यांचे पूजन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, सयाजी यादव, जे. डी. मोरे, वसंतराव शिंदे, श्रीरंग देसाई, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले यांची प्रमुख उपस्थिती होती.


कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला नुकताच प्रारंभ करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सुसज्ज अशी तोडणी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तेव्हा सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस कृष्णा कारखान्यास गळीतास द्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.


यावेळी कारखान्याचे सेक्रेटेरी मुकेश पवार, प्रोसेस मॅनेजर डी. जी. देसाई, चिफ इंजीनीअर सुहास घोरपडे, असि. जनरल मॅनेजर डिस्टलरी प्रतापसिंह नलवडे, शुगर गोडाऊन किपर रामचंद्र कदम, कामगार कल्याण अधिकारी अरूण पाटील, कार्यालयीन अधीक्षक निलेश देशमुख आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .