सौ.शारदा भस्मे सरपंच सेवा महासंघाच्या पुणे विभागीय महिला उपाध्यक्ष पदी नियुक्ती.
सौ.शारदा भस्मे सरपंच सेवा महासंघाच्या पुणे विभागीय महिला उपाध्यक्ष पदी नियुक्ती.
सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य च्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडुज येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.शारदा सजंय भस्मे यांची पुणे विभागीय महिला उपाध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही संघटना सरपंचाच्या न्याय व हक्कासाठी लढणारी महाराष्ट्रातील एकमेव नोंदणीकृत संघटना आहे. आज पर्यंत राज्य कार्यकारिणी ने शासनस्तरावर विविध मागण्या मंजूर करून घेतल्या हे उल्लेखनीय आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडुज हे गाव सर्वात मोठ आहे येथील सामाजिक कार्यकर्त्या विविध क्षेत्रातील पुरस्कारकार प्राप्त सौ. शारदा संजय भस्मे त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन, संघटना वाढीसाठी त्यांच्या खांद्यावर पुणे विभागीय महिला उपाध्यक्ष पदाची जबाबदारी राज्य कार्यकारिणी च्या सल्ल्यानुसार सरपंच सेवा महासंघ संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम अंबादास घोगरे, राज्य मानद अध्यक्ष चंद्रकांत बधाले, राज्य संपर्कप्रमुख राहुल मारोतराव उके, राज्य संघटक अण्णा साहेब जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली . ते आपल्या नियुक्ती चे श्रेय सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राज्याअध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, राज्य मानद अध्यक्ष चंद्रकांत बधाले, कार्याध्यक्ष माधवराव गंभीरे, राज्य संपर्कप्रमुख राहुल उके, कोअर कमिटी अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, राज्य संघटक अण्णा साहेब जाधव, राज्य सल्लागार हनुमंत सुर्वे, राज्य संघटीका ज्योती अवघड, राज्य कार्यकारिणी सदस्य सतिश साखरे, भाऊसाहेब गिराम सोशल मीडिया प्रमुख भाऊसाहेब कळसकर, पुणे विभागीय अध्यक्ष चंद्रकांत गव्हाणे, संजिवनी कापरे, पुणे जिल्हा सौ. क्रांती ताई गाढवे, सातारा जिल्हा अध्यक्ष प्रवीण घोरपडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण यादव, सरपंच माझा चे संचालक रामनाथ बोर्हाडे, यांना देत आहे .
त्यांच्या नियुक्ती मुळे सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव व स्वागत होत आहे.
Comments
Post a Comment