६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.
६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.
'समता नगर नाटोली ता- शिराळा येथे संपन्न.'
कराड - प्रतिनिधि,
दि.१४ ऑक्टोंबर २०२१ संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. समता नगर नाटोली तालुका शिराळा जिल्हा सांगली याठिकाणी संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने व भारतीय बौद्ध महासभा शिराळा तालुका यांच्या अंतर्गत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले."धर्मांतर झाले परंतु परिवर्तनाचे काय" या विषयावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.अमोल कांबळे सर यांनी महत्त्वपूर्ण व्याख्यान देत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तत्त्वनेच आपली प्रगती होईल,त्याशिवाय आपण सर्वजण शून्य आहोत. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे डॉ.बाबासाहेबांचे वाक्य किती महत्त्वाचे आहे हे पटवून देत प्राध्यापक अमोल कांबळे सर यांनी उपस्थित बौद्ध उपासक- उपासिकांना व्याख्यानाद्वारे सांगितले. यावेळी संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्राचे संस्थापक /अध्यक्ष डॉ. संदीप कांबळे यांनी परिवर्तन घडवायचे असेल तर बाबासाहेबांच्या विचारांनी आयुष्य समृद्ध करणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजासाठी प प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवणे महत्त्वाचे आहे.ते काम संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. असे मत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ बौद्धाचार्य नामदेव कांबळे सर यांनी मार्गदर्शन केले. संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी व समता नगर नाटोली येथील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिराळा तालुक्यातील उपासक-उपासिका कार्यक्रमास उपस्थित होते. सौरभ कांबळे , किरण कांबळे , सुरेश कांबळे सर्जेराव कांबळे , इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment