Posts

Showing posts from August, 2020

येवती येथील जय महाराष्ट्र गणेश मंडळाचा एक गाव एक गणपती हा उपक्रम आदर्शवत.

Image
  येवती येथील जय महाराष्ट्र गणेश मंडळाचा एक गाव एक गणपती हा उपक्रम आदर्शवत. कराड- प्रतिनिधी (ज्ञानेश्वर शेवाळे ) येवती येथील जय महाराष्ट्र गणेश मंडळाचा एक गाव एक गणपती हा उपक्रम आदर्शवत अनेक वर्षांपासून एक गाव एक गणपती मंडळाचा आदर्श घेण्यासारखा  आहे.  येवती ता. कराड येथील जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळाने गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या गावामधे एक गाव एक गणपती हा उपक्रम सुरू केला आहे साधारण पणे ३० वर्षांपासून या उपक्रमास सुरुवात झाली या मंडळाचा आदर्श  इतरांनाही खरच घेण्यासारखा आहे मंडळाच्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. 

कराड दक्षिणेत भाजपाचे घंटानाद आंदोलन..भाजपा कराड दक्षिण मंडलाच्यावतीने मंदिरा समोर सरकारचा निषेध करत केला घंटानाद.

Image
  कराड दक्षिणेत भाजपाचे  घंटानाद आंदोलन .   भाजपा कराड दक्षिण मंडलाच्यावतीने मंदिरा समोर सरकारचा निषेध करत केला घंटानाद. मलकापुर/प्रतिनिधी  महाराष्ट्र सरकारने जनतेच्या भावनांची कदर करत कराड तालुक्यातील सर्व मंदिरे उघडी करावीत यासाठी शहर परिसरातील मंदिरासमोर घंटानाद आंदोलने करण्यात आली.  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील ,विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुलबाबा भोसले ,जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर,शेखर चरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड दक्षिण मंडलातील शहरासह सर्व गावातील मंदिरासमोर भाजपच्यावतीने आंदोलने करण्यात आली.   दार उघड उध्दवा दार उघड , तिघाडी सरकारचा निषेध असो, दारु दुकानांना परवानगी मग मंदिरे बंद का ? अशा घोषणांनी मंदिर परिसर दणाणून सोडला. बंद देवालये उघडी करण्यासाठी जनभावना तीव्र असुन राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याचा आदेश द्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.  शहरातील दत्तचौक ,मलकापुर,कोयनावसाहत,जखिनवाडी, कापिल, गोटे, खोडशी, रेठरे बुद्रुक,मुंडे, चचेगाव, वाठार , काले, जुजारवाडी, येणके, म...

मॅग फायनान्स कंपनी ला कोरोना योद्धा हा सन्मान.

Image
    मॅग फायनान्स कंपनी ला कोरोना योद्धा हा सन्मान. कराड -प्रतिनिधी (ज्ञानेश्वर शेवाळे ) लॉकडाउन च्या काळात  प्रशासकीय अधिकारी,  डॉक्टर,नर्स,आशा, अंगणवाडी सेविका, प्रत्येक व्यक्तीने, सामाजिक संस्थेने, केलेल्या कार्याची दखल घेऊन कराड येथील एस के फायनान्सेस सर्विस च्या वतीने कोरोना योद्धा हा सन्मान देण्यात आला या मध्ये फलटण येथील मॅग फायनान्स प्रा. लि कंपनी च्या कराड शाखेला कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले लॉकडाउन च्या काळात देखील या कंपनीने आपली सामाजिक बांधिलकी जपत बचत गटाच्या महिलांना मास्क चे वाटप केले होते. या कंपनीच्या माध्यमातून चांगली आणि पारदर्शक सेवा दिली जाते त्यामुळे अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या सन्माना बदल कराड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक दिप ज्योती पाटील, कंपनीचे संचालक अनिल मोहटकर, कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सुळ आदी अभिनंदन केले. कंपनी च्या वतीने ज्ञानेश्वर शेवाळे यांनी हा सन्मान स्विकारला.

शेडगेवाडी बाजारपेठ तिन दिवस पुन्हा कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय.

Image
  शेडगेवाडी बाजारपेठ  तिन दिवस पुन्हा कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय. शिराळा - प्रतिनिधी (आनंदा  सुतार)  शेडगेवाडी ता.शिराळा येथे सहा रुग्ण पाॅझिटीव्ह आल्याने  व्यापाऱ्यांनी  स्वयम स्फुर्तीने बाजारपेठ कडकडीत पणे तिन दिवसांसाठी सोमवार ते बुधवार पर्यत बंद ठेवण्याचा निर्णय  घेण्यात आला असुन मागील काही दिवसांमध्ये शिराळा तालुक्यात विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्ये मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच शेडगेवाडी बाजार पेठेतील व्यापारीच पाॅझिटीव्ह रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण तयार झाले आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सोमवार पासुन पुढील तिन दिवस  औषधाची दुकाने, व दवाखने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी देखील घरातच राहून कोरोना साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यत आले असुन अत्यावश्यक गटात मोडणा-या किराणा ,दुध विक्री,कृषी सेवा केंद्र, भाजी पाला बाजार ही बंद ठेवण्यास दुकानदारांनी संमती दिली असुन शेडगेवाडी बाजार पेठ पुढील तिन दिवस कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे.

ओंडोशी येथे संजय नांगरे यांचे मार्फत स्वाध्यायपुस्तिका व शैक्षणिक साहित्याचे वाटप.

Image
  ओंडोशी येथे संजय नांगरे  यांचे मार्फत स्वाध्यायपुस्तिका व शैक्षणिक साहित्याचे वाटप.     उंडाळे-प्रतिनिधी (प्रदिप पाटील) कोविड-19 मुळे शाळा बंद आहेत . त्यामुळे शाळा बंद शिक्षण चालू उपक्रमा अंतर्गत  ओंडोशी शाळेचे मुख्याध्यापक   संजय नांगरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओंडोशी  येथील शाळेतील सर्व मुलांना मराठी, गणित, इंग्रजी  विषयांच्या एकत्रित आसणा-या  स्वाध्यायपुस्तिकेचे व लेखन साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.           सध्या शाळा बंद आहेत या काळात शिक्षण बंद राहू नये विद्यार्थ्यांची खरी गरज ओळखून आॕनलाइन शिक्षणा बरोबरच आॕफलाइनही शिक्षण  चालू राहावे यासाठी संजय नांगरे  यांनी सर्व मुलांना इयत्तावार 'अनुज प्रकाशन' निर्मित ज्ञानरचनावादावर आधारित , मुलांना स्वतः सोडवता येईल अशा  स्वाध्यायपुस्तिकेचे व लेखन साहित्य किटचे वाटप केले. त्यांचे  सर्वत्र कौतुक होत आहे.त्याचबरोबर सरपंच सुनिल मोरे यांनी शब्दतरंग प्रश्नसंचाचे प्रत्येक विद्यार्थांस वाटप केले.             ...

शिराळा शहरात कृत्रिम गणेश विसर्जनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी नागरिकांचा चांगला प्रतिसाद.

Image
  शिराळा शहरात कृत्रिम गणेश विसर्जनाचा  नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी, नागरिकांचा चांगला प्रतिसाद.   शिराळा-  प्रतिनिधी  (आनंदा  सुतार) शिराळा शहरांमध्ये दिवसें दिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून शहरामध्ये गणेश उत्सव सणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी नगरपंचायतीने शहराच्या प्रमुख ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. नागरिकांनी याचा पुरेपूर वापर केला असून हा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी झाला आहे. शिराळा येथील घुमट वस्ती- होळीचे टेक येथील कृत्रिम गणेश मूर्ती विसर्जन तळ्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील, उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील, नगरसेवक उत्तम डांगे, सिमा कदम यांच्या उपस्थितीत झाले.  या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.शिराळा शहरांमध्ये कृत्रिम गणेश विसर्जन स्थळांचा पहिल्यांदाच प्रयोग नगरपालिकेने केला असल्याचे सांगितले. शहरातील नागरिकांनी व महिलांनी याचा पुरेपूर वापर करून प्रदूषण टाळण्याचे आवाहन केले. महिलांनीही गौरीचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तळ्याचा वापर करून शहरांमध्ये एक वेग...

तत्वाशि ठाम राहिलेले नेतृत्व- स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब

Image
    तत्वाशि ठाम राहिलेले नेतृत्व- स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब आनंदा सुतार शिराळा, सांगली प्रतिनिधी  राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन गोरगरिबांसाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व म्हणून स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांच्याकडे पाहिले जात होते त्यांनी आयुष्यभर पक्षनिष्ठा जोपासत राजकारणात राहून अनेकांच्या सोबत अजातशत्रू असे नाते निर्माण करण्यात ते राज्यात यशस्वी ठरले होते.त्यांनी वसंतदादांचे राजकीय वारसदार म्हणून आपली ओळख निर्माण केली होती अशा या व्यक्तिमत्वाला ८५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन साहेबांनी डोंगरी परिषद घेऊन अनेक तालुक्यांना डोंगरी विभागाचा लाभ मिळवून दिला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक खात्याचे प्रभावीपणे काम केले त्यांनी विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून वेगळी छाप निर्माण केली होती त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते गौरविण्यात आले होते अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या ते सदस्य राहिले होते एक निष्ठावंत नेता म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत ओळख निर्माण केली त्यांचे मुंबईत असणारे वास्तव्य हे अनेक कार्यकर्त्यांसाठी ता...

पोलीस उपनिरीक्षक दिपज्योती पाटील यांना कोरोना योद्धा हा सन्मान.

Image
  पोलीस उपनिरीक्षक दिपज्योती पाटील यांना कोरोना योद्धा हा सन्मान. उंडाळे - प्रतिनिधी,  ऊंडाळे पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक दिप ज्योती पाटील यांना कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले कराड येथील एस के कंपनी च्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला या मध्ये पोलीस उपनिरीक्षक दिप ज्योती पाटील यांनी ऊंडाळे परिसरात लॉकडाउन च्या काळात या परिसरातील पोलीस पाटील सरपंच यांना आपल्या गावात जनजागृती करून प्रशासनास सहकार्य करावे व त्या स्वतः देखील या अविरतपणे या अभियानात सहभागी झाल्या त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना कोरोना योद्धा हा सन्मान देण्यात आला त्या प्रसंगी पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे पोलीस कॉन्स्टेबल काळे पोलीस काँसटेंबल खराडे उपस्थित होते.

‘दीप उजळतो आहे’ या फोटोबायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन. "आईवडिलांच्या हस्ते केलं पुस्तकाचा प्रकाशन ".

Image
  ‘ दीप उजळतो आहे’ या फोटोबायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन. "आईवडिलांच्या हस्ते  केलं पुस्तकाचा प्रकाशन ". कराड- प्रतिनिधी( ज्ञानेश्वर शेवाळे ) गणेशचतुर्थीच्या शुभमुर्हूतावर डाॅ.संदीप डाकवे यांच्या फोटोबायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन त्यांची आई सौ.गयाबाई डाकवे, वडील श्री.राजाराम डाकवे (तात्या), पत्नी सौ.रेश्मा डाकवे, चि. स्पंदन डाकवे, कु.पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे यांच्या हस्ते उत्साहात पार पाडले. पुस्तक प्रकाशनाचा मान आई वडील व कुटूंबियांना दिल्यामुळे सर्वजण भारावून गेले. घरगुती वातावरणात हा सोहळा पार पडला. डाॅ.संदीप डाकवे यांचा आतापर्यंतचा जीवनप्रवास या पुस्तकात फक्त फोटोच्या साहय्याने दर्शवण्यात आला आहे. या पुस्तकाची संकल्पना, मांडणी आणि रचना स्पंदन अॅडव्र्हटायझींग यांच्या वतीने करण्यात आली आहे. स्पंदन प्रकाशनाच्यावतीने सदर पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. डाॅ.संदीप डाकवे यांचे हे तिसरे पुस्तक असून पहिले पुस्तक माजी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.शंभूराज देसाई व अन्य मान्यवर यांच्या हस्ते झाले तर दुसरे पुस्तक प्रकाशन पद्मश्री नीलकंठ खाडीलकर (भाऊ), शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार...

"रयतेचे स्वराज्य " प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम. " अभिनेत्री अश्विनी महांगडे सातारा जिल्हामधील गोरगरीब महिला व युवती साठी करणार मोठे सामाजिक कार्य."

Image
 "रयतेचे स्वराज्य " प्रतिष्ठानचा अभिनव  उपक्रम. "  अभिनेत्री अश्विनी महांगडे सातारा जिल्हामधील गोरगरीब महिला व युवती साठी करणार मोठे सामाजिक कार्य." 'महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांची घेतली भेट' कराड  - प्रतिनिधी (ज्ञानेश्वर शेवाळे) रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान सामाजिक कार्यासाठी सतत प्रयत्नशील असते हीच परंपरा कायम राखत प्रतिष्ठानच्या माध्यमातून राणु आक्का फेम अश्विनी महांगडे सातारा जिल्हामधील गोरगरीब महिला व युवती साठी  मोठे सामाजिक कार्य करणार आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील राणु आक्का फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान संस्थे मार्फत गोरगरीब महिला युवती यांच्या प्रती सामाजिक कार्य राज्यात सुरू आहे सातारा जिल्ह्यातील देखिल हे कार्य सुरू ठेवण्यासाठी त्यांनी नुकतीच जिल्हा महिला बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांची भेट घेऊन सातारा जिल्ह्याची माहिती जाणून घेत चर्चा केली. वाई तालुक्यातील पसरणी येथील अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान च्या माध्यमातून राज्यात सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात सु...

भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण मंडलाच्या वतीने, साळशिरंबे ता.कराड येथील कोरोना योद्ध्यांचा सन्मान देऊन गौरव करण्यात आला.

Image
  भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण मंडलाच्या वतीने, साळशिरंबे ता.कराड येथील कोरोना योद्ध्यांचा सन्मान देऊन गौरव करण्यात आला. साळशिरंबे -प्रतिनिधी,  कोरोना कालखंडात आपली सेवा बजावणाऱया सर्व  कर्मचाऱयांचा भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण मंडलाच्या वतीने सन्मान. साळशिरंबे आंगणवाडी सेविका मा.सौ.संगीता कुंभार, मा.श्रीमती.अर्चना पाटील, मा.सौ.कमल गावडे. आरोग्य सेविका जंग मॅडम ,आशा सेविका, ग्रामपंचायत सेवक, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस कर्मचारी ,यांचा सन्मान करण्यात आला .यावेळी, भाजपा युवा मोर्चा कराड दक्षिण तालुकाध्यक्ष मा.पंकज पाटील,माजी उपसरपंच ,मा.वसंत मोहिते, माजी सोसायटी चेरमन मा.सदाशिव पाटील, माजी सोसायटी चेरमन मा.तानाजी पाटील (आबा) मा.दिलीप पाटील, मा.जयकर पाटील, पै. दादासो पाटील,  रवींद्र चोपडे ,मा.योगेश गावडे, मा.दादासो पाटील, मा.हणमंत यादव, मा.सचिन मोहिते, मा.अरविंद यादव, मा.अमर पाटील, मा.रमेश बाबर, मा.अधिक पाटील, इत्यादी उपस्थित होते.

प्रकाश थोरात यांना कोरोना योद्धा हा सन्मान.

Image
  प्रकाश थोरात यांना कोरोना योद्धा हा सन्मान. कराड- प्रतिनिधी (ज्ञानेश्वर शेवाळे )  ओंड ता कराड येथील माजी उपसरपंच प्रकाश थोरात यांना एस के फायनान्सेस या कंपनीच्या वतीने कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले. त्या प्रसंगी शशिकांत थोरात रघुनाथ थोरात विलास पोळ बाळासाहेब नांगरे संजय थोरात भरत थोरात जयवंत थोरात उपस्थित होते.

शशिकांत थोरात यांना कोरोना योद्धा हा सन्मान.

Image
  शशिकांत थोरात यांना कोरोना योद्धा हा सन्मान. कराड - प्रतिनिधी( ज्ञानदेव शेवाळे )  ओंड ता कराड येथील शिशारा धर्मादाय ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष शशिकांत थोरात यांना कराड येथील एस के कंपनी च्या वतीने कोरोना योद्धा हा सन्मान देण्यात आला त्या प्रसंगी बाबासाहेब थोरात,उत्तम थोरात, रावसाहेब शिंदे संजय थोरात,जयवंत थोरात, उपस्थित होते या बद्द्ल नांदगाव पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव डांगे  पोलीस पाटील विजय थोरात पोलीस पाटील वंदना माळी यांनी अभिनंदन केले.

साळशिरंबे गावातील तलाठी श्री.दिपक कानकेकर व ग्रामसेवक श्री.शरद चव्हाण यांचा कोरोना योद्धा या सन्मानाने गौरव.

Image
साळशिरंबे गावातील तलाठी श्री.दिपक कानकेकर व  ग्रामसेवक श्री.शरद चव्हाण यांचा कोरोना योद्धा या सन्मानाने गौरव. साळशिरंबे- प्रतिनिधी, भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण मंडलाच्या वतीने, साळशिरंबे ता.कराड येथील कोरोना योद्ध्यांचा सन्मान देऊन गौरव करण्यात आला. यावेळी  साळशिरंबे गावातील तलाठी श्री.दिपक कानकेकर व  ग्रामसेवक श्री.शरद चव्हाण यांचा कोरोना योद्धा या सन्मानाने गौरव. यावेळी, भाजपा युवा मोर्चा कराड दक्षिण तालुकाध्यक्ष मा.पंकज पाटील, मा.राजेश शेवाळे, मा.तानाजी पवार, मा.गणेश यादव इत्यादी उपस्थित होते.

लक्ष्मण मंडले यांचा पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सत्कार.

Image
  लक्ष्मण मंडले यांचा पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सत्कार.  कराड- प्रतिनिधी , लक्ष्मण मंडले यांचा पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सत्कार. मनव गावचे सुपुत्र व पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण मंडले यांची कोरोना योद्धा हा सन्मान स्पंदन या सामाजीक संस्थेच्या वतीने देण्यात आला.या बद्द्ल त्यांचे कराड चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी सुद्धा त्यांचा सन्मान केला तर पाणी पुरवठा विभागाच्या वतीने उप अभियंता सुनील आडके यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी शाखा अभियंता रेखा महंतो कनिष्ठ अभियंता एस पाटील सहाय्यक प्रकाश भोईर सह सर्व कर्मचारी उपस्थित होते. कराड : क राड चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी सुद्धा त्यांचा सन्मान केला

ही जातीयविकृती संपणार कधी ??

Image
  ही जातीयविकृती संपणार कधी ?? "भिम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष मा.उत्तरेश्वरजी कांबळे यांची थेट हॉस्पिटलमध्ये ." 'जळीत आदिवासी मुलीवर निःशुल्क इलाज.'    अहमदनगर- गोंडवाना न्यूज नेटवर्क .   पुरोगामी महाराष्ट्रातील जातीयवाद्यांचा नंगानाच थांबायचं नाव घेत नाही , बुरसटलेल्या विकृत विचारसरणीचे हैवान रोज इथल्या मातीला कलंकित करीत आहे , शरमेने मान खाली घालायला लावत आहे.असाच अघोरी आणि माणुसकीला काळिमा फासणारा नीच प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातीलवाघुंडे येथे घडला. ह्याच गावात आमच्या आदिवासी समाजातील महिलेवर सहा महिन्यापूर्वी काही वासनांध नराधमांनी  अत्याचार केला होता.               "ती केस काढून घे" म्हणून जातीयवादी गावगुंडानी त्या पिडीत महिलेच्या अवघ्या १० वर्षाच्या कोवळ्या मुलीवर पेट्रोल टाकून जाळले होते. त्यात ती मुलगी सुमारे १२ % भाजली होती. ह्याची खबर लागताच भिम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष मा.उत्तरेश्वरजी कांबळे यांनी  तडक ही जळीत मुलगी ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती त्या 'सुपा' ह्या गावातील डॉ.जगताप साहेबांच्या हॉस्प...

चांदोली धरणातुन विसर्ग केला कमीः आरळा-शित्तुर,चरण-सोंडोली पुल खुले

Image
  चांदोली धरणातुन विसर्ग केला कमीः आरळा-शित्तुर,चरण-सोंडोली पुल खुले आरळा-शित्तुर,चरण-सोंडोली पुल खुले शिराळा-  प्रतिनिधी (आनंदा सुतार) चांदोली धरण परीसरात  पावसाने उघडीप दिल्यामुळे  डोंगर माथ्यावरुन  चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणार्‍या पाण्याची आवकही कमी झाली आहे त्यामुळे चांदोली धरणातुन वारणा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या सांडव्यातुन १६२६ क्युसेक्स तर वीजनिर्मीती केंद्रातुन १३६९ क्युसेक्स असे एकुण २ॅ९९५ क्युसेक्स पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. चांदोली परीसरात  गेल्या आठवड्यात दमदार पाऊस कोसळत होता त्यामुळे धरणाच्या सांडव्यातुन वारणा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्गही वाढविण्यात आला होता त्यामुळे चांदोली परिसरात पुरस्थिती निर्माण झाली होती वारणा नदीचे पाणी नदी काठच्या ऊस भात पाकांमध्ये शिरले होते तसेच वारणा नदी वरील आरळा-शित्तुर ,चरण-सोंडोली हे पुलही पाण्याखाली जावून जनजीवन विस्कळीत झाले होते याच बरोबर सोनवडे,चरण येथील स्मशान शेडमध्ये ही पुराचे पाणी शिरले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासुन परीसरा...

टाळगाव येथे भारतीय जनता पार्टी कराड तालुका दक्षिण मंडलाच्या वतीने कोरोना योद्धाचा सन्मान .

Image
    टाळगाव येथे भारतीय जनता पार्टी कराड तालुका दक्षिण मंडलाच्या वतीने  कोरोना योद्ध्यांचा सन्मान .   उंडाळे- प्रतिनिधी , टाळगाव येथे कोरोना योद्धाचा सन्मान भारतीय जनता पार्टी कराड तालुका दक्षिण मंडलाच्या वतीने करण्यात आला.टाळगाव ,शेवाळवाङी  यागावात डाॅकटर, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस पाटील यांचे कोरोना काळातील योगदानाबदल पक्षाच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर प्रसंगी मा.अशोक पाटील. मा. चेअरमन सर्जेराव देसाई. शंकर जाधव. दादासाहेब सपकाळ व पोलीस पाटील. मा.निवास सपकाळ. आदी मान्यवर उपस्थित होते.

साळशिरंबे गावातील सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय सर्व गणेश मंडळांच्या वतीने घेण्यात आला.

Image
  साळशिरंबे गावातील सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय सर्व गणेश मंडळांच्या वतीने घेण्यात आला.   साळशिरंबे - प्रतिनिधी, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन साळशिरंबे  गावातील सर्व गणेश मंडळांनी  सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मा.दिपज्योती पाटील (पो.उनि.उंडाळे पोलीस स्टेशन) यांच्या प्रमुख उपस्थित, सरपंच मा.तात्यासाहेब पाटील, उपसरपंच, मा.तानाजी साठे, तंटामुक्ति समिती अध्यक्ष मा.रमेश पाटील, पोलीस पाटील मा.उमा पाटील माजी तंटामुक्ति उपाध्यक्ष मा.पंकज पाटील व गावातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते .

भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण मंडलाच्या वतीने, साळशिरंबे ता.कराड येथील कोरोना योद्ध्यांचा सन्मान देऊन गौरव.

Image
भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण मंडलाच्या वतीने, साळशिरंबे ता.कराड येथील कोरोना योद्ध्यांचा  गौरव. "उंडाळे पोलीस स्टेशनच्या पो.उनि. मा.दिपज्योती पाटील यांच्या  उपस्थितीत ." साळशिरंबे - प्रतिनिधी,  भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण मंडलाच्या वतीने, साळशिरंबे ता.कराड येथील कोरोना या महामारी ला रोखण्यासाठी  काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱयांचा कोरोना योद्ध्यां   सन्मान देऊन गौरव करण्यात आला .  साळशिरंबे गावातील, डॉक्टर, आरोग्य सेविका आंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील यांना कोरोना योद्धा सन्मान देऊन गौरव करण्यात आला.यावेळी, भाजपा युवा मोर्चा कराड दक्षिण तालुकाध्यक्ष मा.पंकज पाटील, पै.प्रकाश पाटील, पै.अमर पाटील, मा.जयकर पाटील, पै.अमोल पाटील मा.तानाजी पवार, मा.रणजीत देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

लक्ष्मण मंडले यांना कोरोना योद्धा सन्मान.

Image
  लक्ष्मण  मंडले यांना कोरोना योद्धा  सन्मान देऊन गौरव. कराड- प्रतिनिधी,   पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण मंडले यांना कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले. स्पंदन चारिटेबल ट्रस्ट च्या वतीने कोरोनो काळात देखील आपले काम अविरतपणे सुरू ठेवले व सामाजिक बांधिलकी जपली अशा व्यक्तींचा सन्मान या संस्थेच्या वतीने घेण्यात आला या मध्ये कराड पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण मंडले यांची कोरोना योद्धा हा सन्मान गटविकास अधिकारी डॉ आबासाहेब पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्या प्रसंगी संस्थेचे सदस्य पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे शाखा अभियंता एस एस पाटील कनिष्ठ सहाय्यक प्रकाश भोईर यांची उपस्थिती होती या वेळी मंडले यांनी सन्मान दिल्या बद्दल संस्थेचे व संपूर्ण पाणी पुरवठा विभागाचे आभार मानले.त्यांचा सन्मान झाल्या बदल विविध स्तरांतुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.  

भीम आर्मी सांगली जिल्हा संघटक पदी महेश कांबळे. सुरज कांबळे यांची कडेगाव तालुकाध्यक्ष व शंभु गवाळे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड."

Image
  भीम आर्मी सांगली जिल्हा संघटक पदी महेश कांबळे. "सुरज कांबळे यांची कडेगाव तालुकाध्यक्ष व शंभु गवाळे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड." '   पश्चिम   महा.अध्यक्ष जावेद नायकवडी यांचे हस्ते व  जिल्हा निरिक्षक संतोषजी थोरवडे यांचे उपस्थितीत  ' कराड - प्रतिनिधी, भीम आर्मी या सामाजिक संघटनेच्या सांगली जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या  निवडी नुकत्याच पार पडल्या.  यावेळी भीम आर्मी सांगली जिल्हा संघटकपदी वांगी ता.कडेगाव येथिल महेश कांबळे यांची निवड करण्यात आली तसेच   सुरज कांबळे यांची कडेगाव तालुकाध्यक्ष व शंभु गवाळे यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.   या वेळी भीम आर्मीचे सांगली जिल्हा निरिक्षक संतोषजी थोरवडे हे  उपस्थितीत होते तसेच विशेष उपस्थिती  प.महा.अध्यक्ष जावेद नायकवडी यांची होती यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.यावेळी अभिषेक कांबळे,सत्यवान कोळी,इरफान मुल्ला,गजानन कुंभार अदि उपस्थित होते.

मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी येथे अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा

Image
  मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी येथे अनोख्या पद्धतीने वाढदिवस  साजरा. शिराळा - प्रतिनिधी (आनंदा सुतार)  आनंदराव पाटील मिस्त्री यांचा वाढदिवस  मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी येथे अनोख्या पद्धतीने मान्यवरांच्या उपस्थित साजरा झाला. वाढदिवसाचा तसेच त्यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झालेनंतर  होणार सत्कार संभामारंभ यावरील अनावश्यक खर्च टाळून   मल्लविद्या कुस्ती केंद्रातील गोरगरीब व मेहनती मल्लांना दहा किलो बदाम व तुप  आनंदराव पाटील यांच्याकडून वाटप करण्यात आले. यावेळी पाटील म्हणाले आपण ही समाजासाठी काही तरी देणे लागतो याच भावनेतुन व कुस्ती मल्लविद्या महासंघ संस्थापक पै.गणेशराव मानुगडे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती मल्लविद्या महासंघातील प्रत्येक पदाधिकारी नेहमीच असे नवनवीन उपक्रम राबवत असतात. अनेक मल्लांच्या घरची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत असते अनेकवेळा खुराकासाठी पैसे उपलब्ध होत नाहीत त्यामुळे कुस्ती मेहनतीवर परिणाम‌ झालेला दिसून येतो. हिच बाब लक्षात घेऊन कुस्ती मल्लविद्या महासंघ कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष मा.आनंदराव पाटील मिस्त्री यांनी निवडीच...

खुजगांव येथे गणेशोत्सव मंडळाचा यंदा सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय.

Image
  खुजगांव  येथे गणेशोत्सव मंडळाचा यंदा सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय .   शिराळा -  प्रतिनिधी(आनंदा सुतार) कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खुजगांव ता.शिराळा येथील  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी यंदा सार्वजनिक गणपती उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता 'देश हाच देव' मानुन यंदा गणेश उत्सव साजरा न करण्याचं सर्व मंडळानी एक मताने ठरवलं आहे. तसेच येणारा नवरात्रीच्या काळातही दुर्गामाता उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावात व परीसरात कोविडच्या रुग्णांची वाढती संख्या पहाता सर्व मंडळांच्या पदाधीकार्‍यांची ग्रामपंचायत कार्यालयात  बैठक घेवुन सर्वानु मते हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मीयांनी आपापले सण साधेपणाने व शक्यतो घरात राहूनच साजरे करावेत, असं आवाहन प्रशासनाने सुरुवाती पासूनच केलं आहेच. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने  अलीकडेच या विभागातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींन सोबत बैठकाही घेतल्या होत्या. या बैठकींमध...

येवती ता कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरव.

Image
  येवती ता.कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरव. "एस .के.फायनान्स कंपनी च्या वतीने व  पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या हस्ते ." उंडाळे- प्रतिनिधी , येवती ता कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले. येवती ता कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या परिसरातील गावा गावात आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या तर या परिस्थितीत देखील या आरोग्य केंद्राच्या कर्मचारी यांनी रात्रंदिवस काम केले या आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष पाटील यांनी स्वतः रात्रंदिवस काम पाहिले याच कामाची दखल घेऊन कराड येथील  सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या एस के फायनान्स कंपनी च्या वतीने येवती आरोग्य केंद्रास कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले हा सन्मान पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या हस्ते देण्यात आला या वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष पाटील व कर्मचारी उपस्थित होते.

येवती ग्रामपंचायतीला कोरोना योद्धा हा सन्मान

Image
  येवती ग्रामपंचायतीला कोरोना योद्धा हा सन्मान . "कराड येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिक शहा  यांचेतर्फे" . 'पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचे हस्ते ग्रामपंचायतीला देण्यात आला.' उंडाळे -प्रतिनिधी , कराड तालुक्यातील येवती ग्रामपंचायतीला कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले. कराड येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिक शहा यांच्या माध्यमातून कोरोना योद्धा चा सन्मान करण्यात आला या मध्ये येवती ग्रामपंचायतीचे योगदान फार मोठे आहे याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचे हस्ते ग्रामपंचायतीला देण्यात आला त्या प्रसंगी सरपंच सागर शेवाळे उपसरपंच सविनय सोरटे सदस्य भगवान शेवाळे. कोतवाल साठे. सुरेश शेवाळे,तलाठी सागर दळवी उपस्थित होते सन्मान मिळाल्या बद्दल ग्रामस्थांनी देखील अभिनंदन केले. ...

साईसम्राट इन्स्टिट्यूट कडून ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्ष लागवड व वाटप.

Image
  साईसम्राट इन्स्टिट्यूट कडून ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्ष लागवड व वाटप.  "पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी, जीवित सर्व आत्म्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्ष लागवड व संगोपन अत्यावश्यक बाब  "___ धैर्यशील पाटील. कराड - प्रतिनिधी. पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी, जीवित सर्व आत्म्यांचा अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्ष लागवड व संगोपन अत्यावश्यक बाब आहे.   जंगलतोड रोखून जल व्यवस्थापन  केल्यास पुढील भविष्य शास्वत होऊ शकते असे मत साईसम्राट इन्स्टिट्यूट, सुपर्ब चहा व विविध उद्योगाचे मार्गदर्शक विश्वस्त धैर्यशील पाटील यांनी पेठ, नेर्ले परिसरातील शेतकऱ्यांना संबोधले. धैर्यशील पाटील म्हणाले अमेरिका,युरोप या खंडांमध्ये प्रती माणसी १२०० झाडे आहेत, साऊथ एशियन कंट्री मध्ये प्रती माणसी ९० झाडे आहेत व भारतामध्ये प्रती माणसी ५२ झाडे आहेत. अमेरिका, युरोप खंडांमध्ये जंगल व जल याला राष्ट्रीय संपत्ती मानली जाते. आणि पर्यावरणाचा नैसर्गिक आपत्ती व जागतिक तापमानवाढ यांच्यातून वाचवण्यासाठी वृक्ष लागवड व संगोपन केल्याशिवाय पर्याय नाही. विलास झाडे म्हणाले साईसम्राट इन्स्टिट्यूटने नेहमीच सामा...

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर , लोकांना सोशल डिस्टन्ससिंगचा विसर .

Image
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर , लोकांना  पडलाय  सोशल डिस्टन्ससिंगचा  विसर.   उंडाळे -प्रतिनिधी (प्रदिप पाटील ) कोरोनाचा विळख्यात संपूर्ण जग सापडलेले आहे,त्याच बरोबर देशात , राज्यात परिस्थिती गंभीर बनते आहे . सातारा जिल्ह्यामध्ये दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत.  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार कलम १४४ लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांना गर्दी करण्यास सक्त मनाई आहे. तरीही नागरिक शासनाच्या सचारबंदीला धुडकावून मुक्त संचार करीत आहेत. कराड तालुक्यातील दररोज शेकडो रूग्ण बाधित येत आहेत. कराड तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणुन येळगाव ,ओंड व उंडाळे कडे प्रामुख्याने पाहिले जाते मात्र मागील काहि दिवसामध्ये येळगाव पाठोपाठ ओंड मध्येही बाधीत रूग्ण आढळल्याने संबंधित गावांनी पुर्ण खबरदारी घेतली आहे,तर ओंड कोरोना कमिटीने 11आँगस्ट पासुन बेमुदत लॉकडाउन केले आहे.    तालुक्यातील महत्वपुर्ण बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या दोन गावात दुकान व्यवसायिक , भाजीपाला विक्रेत्यांना प्रतिबंध करण्यात आला असल्याने सध्या या ...

मांगरुळ मोरेवाडीत चित्रपटाचे चित्रीकरण.

Image
  मांगरुळ मोरेवाडीत चित्रपटाचे चित्रीकरण. शिराळा  - प्रतिनिधी, मांगरुळ  पैकी मोरेवाडी  येथे आरती फिल्म प्रोडक्शन निर्मित "ती पुन्हा कधीच दिसली नाही" मराठी चित्रपटाच्या चित्रीकरण  सोहळ्याचा शुभारंभ 'श्री भैरवनाथ' मंदिरात भगवान मस्के, विष्णू,मधुकर मस्के, भानूदास पवार,सखाराम,पवार, विजय पवार,संजय सपकाळ,चित्रपट निर्माते राजेश पवार, स्वप्नील कांबळे,गिरीश ताराणी,दिग्दर्शक श्रीनाथ पाटील, सुहास कमल,भिमराव कांबळे,नृत्य दिग्दर्शक प्रदीप माळी,  सुत्रधार सचिन मोहिते, आकाश कांबळे,राजेंद्र खोपडे, निर्मिती व्यवस्थापक स्वप्नील काळे,सुहेल शेटे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.  सदरच्या चित्रपटाचे शिराळा, वाळवा तालुक्यातील ग्रामीण भागात चित्रीकरण होणार असुन ग्रामीण भागातील जनजीवनाचे विदारक सत्य मांडत शिराळा, वाळवा, सांगली येथील कलाकरांना विशेष संधी दिली जात  आहे. चित्रपटात शुभम पवार, किरण गायकवाड, राखी तडाखे, मयुर कदम,सचिन मोहिते, रोहित निकम,राजेंद्र खोपडे, आकाश कांबळे,विशाल पाटील, अशितोष जाधव,निखिल कदम,जालिंदर पाटील, सोनाली आवळे,गौतमी कदम,किरण रोहिदास, रंजना पवार, आस...

खुजगांव पुन्हा कोविड विषाणूच्या विळख्यात.

Image
  खुजगांव पुन्हा कोविड विषाणूच्या विळख्यात. "एका रुग्णाचा कोविड स्वॅब पॉझिटिव्ह."                           शिराळा - प्रतिनिधी(आनंदा सुतार )    खुजगांव ता.शिराळा येथे पुन्हा कोविडचा शिरकाव झाला असुन.  सदरच्या रुग्णाला निमोनिया झाल्याने  कोल्हापुर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.कोविड तपासणी साठी स्वॅब घेतला असता त्याचा अहवाल  आला असुन सदरचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.             सविस्तर वृत्त असे की, खुजगांव येथील सदर कोविड बाधित व्यक्ती डायलेसिसच्या उपचारासाठी कोल्हापुर येथे रितसर ई-पासने जात-येत होते. त्याप्रमाणे मंगळवार दि.०७ ऑगस्टला उपचारासाठी कोल्हापुर ला गेले होते.  सोबत त्यांचा भाऊ व पत्नी होती.सदर रुग्णाला निमोनिया ची लक्षणे असल्याने त्यांचेवर कोल्हापुर येथे उपचार सुरु होते परंतु त्यावेळी त्यांना तिथे श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे  त्यांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा अहवाल शनिवार दि.०८ ऑगस्टला प्राप्त ...

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत रानभाजी महोत्सव

Image
  महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत रानभाजी महोत्सव. शिराळा-  प्रतिनिधी (आनंदा सुतार ) रानभाज्या व सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या, फळे व अन्नधान्याचा दैनंदिन आहारात वापर गरजेचे बनले आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. शिराळा येथील मध्यवर्ती प्रशाकीय इमारतीत आज ता. ९ महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत रानभाजी महोत्सव झाला. त्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे, तालुक्याच्या सभापती वैशालीताई माने प्रमुख उपस्थितीत होते.  आमदार नाईक म्हणाले, रानभाज्या नैसर्गिक वाढलेल्या व विषमुक्त असतात. रानभाजी व सेंद्रिय भाजी आरोग्यासाठी उत्तम असते. रासायनिक खते व किटकनाशके वापरलेल्या भाज्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. शिराळा तालुका डोंगराळ आहे. रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. अन्नधान्य, फळे, भाजीपाला संकरित व रासानिक औषध वापरून पिकवली जात आहेत. त्यामुळे कॅन्सर, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, मुत्रपिंडाचे आदी रुग्ण वाढताना दिसत आहे. गल्लोगल्ली दवाखाने व डॉक्टर झालेत. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. रानभाजी ताटातून गेल्या, आणि रोगराईन...

पावसाचा जोर ओसरला चांदोली धरणातुन पाण्याचा विसर्ग कमी केला

Image
  पावसाचा जोर ओसरला चांदोली धरणातुन पाण्याचा विसर्ग कमी केला. शिराळा -प्रतिनिधी ( आनंदा सुतार)            पावसाचे आगर म्हणून संबोधल्या जाणार्‍या चांदोली धरण परिसरात आज सकाळपासुन  पावसाचा जोर मंदावला असल्यामुळे  चांदोली धरणाच्या  सांडव्यातुन वारणा नदी पात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आज दुपारी कमी करण्यात आला आहे त्यामुळे वारणा नदीची पाणी पातळी हळु हळु कमी होवु लागली आहे   चांदोली  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील सलग पाच दिवस अतिवृष्टी झाली होती त्यामुळे चांदोली धरणाच्या सांडव्यातुन गुरुवार पासुन विसर्ग सुरु करण्यात आला होता त्यानंतर या परीसरात पावसाचा जोर वाढतच राहील्याने विसर्गही वाढविण्यात आला होता मात्र आज सकाळपासुन पावसाने परीसरात उघडीप दिली आहे तसेच चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  येणार्‍या  पाण्याची आवक कमी झाल्याने आज दुपारपासुन धरणाच्या सांडव्यातुन वारणा नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असुन सध्या धरणाच्या सांडव्यातुन ११४३ क्युसेक्स तर वीजगृहातुन १३७४ क्युसेक्स  असे एकु...

कोविड-19 महामारीला रोखण्यासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल.

Image
  कोविड-19 महामारीला रोखण्यासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल__  पालकमंत्री जयंत पाटील. 'मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत'. शिराळा-प्रतिनिधी ( आनंदा सुतार ) सांगली जिल्ह्यात कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी 11 कोटी 30 लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या पुढेही या महामारीला रोखण्यासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृहात सांगली जिल्ह्यातील कोविड प्रादुर्भावाचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ...

शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात अतिवृष्टी.

Image
  शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात अतिवृष्टी.  ' वारणा धरणाच्या सांडव्या वरुन विसर्ग वाढविला, नदी पात्रात आठ हजार पाचशे क्युस्केस पाण्याचा विसर्ग.' "नदी काठच्या गावांना धरण प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा." शिराळा प्रतिनिधी पावसाचे आगर म्हणुन संबोधल्या जाणार्‍या चांदोली परीसरात  गेल्या  पाच ते सहा दिवसा पासुन सलग अतिवृष्टी होत  असून, शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासात धरण क्षेत्रात ७५ मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीच्या पावसाची नोंद वारणावती पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे.मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे  धरणाच्या सांडव्यातुन  वारणा नदी पात्रात सोडण्यात येणार्‍या पाण्याच्या विसर्गात शनिवारी सकाळी दहा वाजता वाढ करण्यात आली आहे. सध्या धरणाच्या सांडव्यातुन ७१०० क्युसेक्स तर विजगृहातुन १४०० क्यूसेक्स असे एकुण ८५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदी  पात्रात सोडण्यात आला आहे.त्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेरून वहात असुन नदी काठची भात व ऊस शेती पाण्याखाली गेली आहे तसेच पावसाचा जोर कायम राहील्यास वारणा नदीच्या पाणी पातळीत ...

सोनवडे येथे बिबटयाच्या हल्ल्यात शेळी ठार ,शेतकऱयांच्यात भितीचे वातावरण.

Image
  सोनवडे येथे बिबटयाच्या हल्ल्यात शेळी ठार ,शेतकऱयांच्यात  भितीचे वातावरण. शिराळा - प्रतिनिधी (आनंदा सुतार ) सोनवडे ता.शिराळा येथील आनंदा साधू नाईक यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोनवडे येथील आनंदा नाईक हे गुरुवारी सकाळी मालकी हद्दीत नेहमी प्रमाणे जनावरे व शेळ्या चारावयास घेऊन गेले होते.दुपारी दोनच्या दरम्यान अचानक बिबट्याने जाळीतून उडी मारून एका शेळीवर हल्ला करून तिला ठार मारले व फरकटत जवळजवळ शंभर फूट दरीत ओढत नेले.ही घटना गुरे चरावयास घेऊन गेलेले शंकर जाधव, संतोष नाईक, शिवाजी काळोखे, महेश नाईक, विलास नाईक यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.घटनास्थळी बिबट्याच्या पायांचे ठसे उमटलेले आहेत.या परिसरात वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करून मयत शेळीचा पंचनामा करावा  नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल...

चांदोलीत अतिवृष्ठी गेल्या चोवीस तासात धरणक्षेत्रात ८८ मिलीमीटर पावसाची नोंद.

Image
  चांदोलीत अतिवृष्ठी गेल्या चोवीस तासात धरणक्षेत्रात ८८ मिलीमीटर पावसाची नोंद.   शिराळा - प्रतिनिधी (आनंदा सुतार) पावसाचे आगर म्हणुन संबोधल्या जाणार्‍या चांदोली परीसरात गेल्या चार पाच  दिवसापासुन अतिवृष्टी होत आहे.गेल्या चोवीस तासात चांदोली धरणक्षेत्रात ८८ मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद येथील पर्जन्य मापन केंद्रावर झाली आहे मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.   चांदोली धरणाच्या सांडव्यातुन व वीजगृहातुन वारणानदी पात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग स्थीर ठेवण्यात आला असुन सध्या धरणाच्या सांडव्यातुन ३००० क्युसेक्स तर वीजगृहातुन १४०० असे एकुण ४४०० क्युसेक्स पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. काल सकाळ पासुन पावसाचा जोर मंदावला असला तरी ही काल पहाटे पर्यंत पडलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर माथ्यावरील ओढे नाले तुडुंब भरुन वहात आहेत त्याचे पाणी वारणा नदीत येत असल्याने वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असुन काही ठिकाणी वारणा नदीचे पाणी ऊस,व भात शेती मध्ये शिरले आहे.याच बरोबर कोकरुड-रेठरे दरम्यान वारणा नदीवर असणारा बंधारा पुल गेल्या तीन दिवसा...

प्रकाश हाॅस्पिटल मध्ये पहीला कोरोना रुग्ण उपचारासाठी दाखल.

Image
  प्रकाश हाॅस्पिटल मध्ये पहीला कोरोना रुग्ण उपचारासाठी दाखल.   शिराळा -प्रतिनिधी (आनंदा सुतार)  शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील ५८ वर्षीय पुरुषाची कोविड टेस्ट पाॅझिटीव्ह आल्याने शुक्रवारी दुपारी ४ वाजता उरुण- इस्लामपुर येथील प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मध्ये  उचारासाठी दाखल झाला हा कोविड पाॅझिटीव्ह रुग्ण उपचारासाठी आलेला प्रकाश हाॅस्पिटल मधील पहीला  रूग्ण असुन हाॅस्पिटल मध्ये तात्काळ ॲॅडमिट करून सदर रूग्णांवर उपचार सुरु करण्यात आल्याची माहीती हाॅस्पिटल व्यवस्थापनाने दिली.  बुधवार दि.५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता सदर रुग्णाच्या हातापायाला गोळे येणे व धाप वाढुन शारीरीक त्रास सुरू झाला म्हणुन उपजिल्हा रुग्णालय शिराळा येथे उपचारासाठी दाखल झाला गुरुवार दि.६ ऑगस्ट ला कोविड टेस्ट घेण्यात आली व त्याचा रिपोर्ट शुक्रवारी दुपारी कोविड पाॅझिटीव्ह आल्याने सदर रूग्णाला पुढील उपचारासाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयातुन उरूण- इस्लामपुर येथील प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मध्ये पाठविण्यात आले . सांगली जिल्ह्यातील वाढती कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासन...

कोडोली गावात सार्वजनिक गणेश उत्सव रद्द करण्याचा एक मुखी निर्णय .

Image
    कोडोली गावात सार्वजनिक गणेश उत्सव रद्द  करण्याचा एकमुखी निर्णय . कार्वे- प्रतिनिधी. कोरोना प्राद्रुभाव रोखण्यासाठी व गाव सुरक्षित ठेवण्यासाठी कोडोली गावातील सर्व युवकांचे एक पाऊल पुढे.गावातील या वर्षीचा सार्वजनिक गणेश उत्सव रद्द करण्याचा एक मुखी निर्णय घेऊन ,कोडोली गाव कोरोना विरूद्धच्या लढाईत गावातील एकजूट दाखवुन इतर गावान आदर्श दाखवुन दिला.गेली चार महिने झाले पोलिस प्रशासनावर जो ताण आहे.त्यांनी आव्हान केल्या नुसार एक गाव एक गणपती .त्याला प्रतिसाद देत कोडोली गावातील सर्व गणेश मंडळणी पोलिस प्रशासनावरती जो ताण आहे तो कमी करण्यासाठी व कोरोना प्रद्रुभाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.पोलिस प्रशासनाने या निर्णयाचे स्वागत करून ,सर्व मंडळांचे अभिनंदन केले.त्याच बरोबर कोडोली ग्रामपंचायत,पोलिस पाटील ,व दक्षता कमिटी यांच्या कडून.सर्व गणेश मंडळांचे जाहीर आभार.वडगाव हवेली दूर क्षेत्राचे पीएसआय दळवी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मीटिंग घेण्यात आली त्याच्यात हा निर्णय घेण्यात आला.