शेडगेवाडी बाजारपेठ तिन दिवस पुन्हा कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय.

  शेडगेवाडी बाजारपेठ  तिन दिवस पुन्हा कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय.


शिराळा - प्रतिनिधी (आनंदा  सुतार)

 शेडगेवाडी ता.शिराळा येथे सहा रुग्ण पाॅझिटीव्ह आल्याने  व्यापाऱ्यांनी  स्वयम स्फुर्तीने बाजारपेठ कडकडीत पणे तिन दिवसांसाठी सोमवार ते बुधवार पर्यत बंद ठेवण्याचा निर्णय  घेण्यात आला असुन मागील काही दिवसांमध्ये शिराळा तालुक्यात विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्ये मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच शेडगेवाडी बाजार पेठेतील व्यापारीच पाॅझिटीव्ह रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण तयार झाले आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सोमवार पासुन पुढील तिन दिवस  औषधाची दुकाने, व दवाखने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी देखील घरातच राहून कोरोना साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यत आले असुन अत्यावश्यक गटात मोडणा-या किराणा ,दुध विक्री,कृषी सेवा केंद्र, भाजी पाला बाजार ही बंद ठेवण्यास दुकानदारांनी संमती दिली असुन शेडगेवाडी बाजार पेठ पुढील तिन दिवस कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .