येवती ता कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरव.
येवती ता.कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरव.
"एस .के.फायनान्स कंपनी च्या वतीने व पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या हस्ते ."
उंडाळे- प्रतिनिधी ,
येवती ता कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले.येवती ता कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या परिसरातील गावा गावात आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या तर या परिस्थितीत देखील या आरोग्य केंद्राच्या कर्मचारी यांनी रात्रंदिवस काम केले या आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष पाटील यांनी स्वतः रात्रंदिवस काम पाहिले याच कामाची दखल घेऊन कराड येथील सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या एस के फायनान्स कंपनी च्या वतीने येवती आरोग्य केंद्रास कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले हा सन्मान पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या हस्ते देण्यात आला या वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष पाटील व कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment