सोनवडे येथे बिबटयाच्या हल्ल्यात शेळी ठार ,शेतकऱयांच्यात भितीचे वातावरण.

 सोनवडे येथे बिबटयाच्या हल्ल्यात शेळी ठार ,शेतकऱयांच्यात  भितीचे वातावरण.

शिराळा - प्रतिनिधी (आनंदा सुतार )

सोनवडे ता.शिराळा येथील आनंदा साधू नाईक यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोनवडे येथील आनंदा नाईक हे गुरुवारी सकाळी मालकी हद्दीत नेहमी प्रमाणे जनावरे व शेळ्या चारावयास घेऊन गेले होते.दुपारी दोनच्या दरम्यान अचानक बिबट्याने जाळीतून उडी मारून एका शेळीवर हल्ला करून तिला ठार मारले व फरकटत जवळजवळ शंभर फूट दरीत ओढत नेले.ही घटना गुरे चरावयास घेऊन गेलेले शंकर जाधव, संतोष नाईक, शिवाजी काळोखे, महेश नाईक, विलास नाईक यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.घटनास्थळी बिबट्याच्या पायांचे ठसे उमटलेले आहेत.या परिसरात वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करून मयत शेळीचा पंचनामा करावा  नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेली शेळी .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .