कराड दक्षिणेत भाजपाचे घंटानाद आंदोलन..भाजपा कराड दक्षिण मंडलाच्यावतीने मंदिरा समोर सरकारचा निषेध करत केला घंटानाद.

 कराड दक्षिणेत भाजपाचे घंटानाद आंदोलन.

 भाजपा कराड दक्षिण मंडलाच्यावतीने मंदिरा समोर सरकारचा निषेध करत केला घंटानाद.



मलकापुर/प्रतिनिधी 

महाराष्ट्र सरकारने जनतेच्या भावनांची कदर करत कराड तालुक्यातील सर्व मंदिरे उघडी करावीत यासाठी शहर परिसरातील मंदिरासमोर घंटानाद आंदोलने करण्यात आली. 


प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील ,विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुलबाबा भोसले ,जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर,शेखर चरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड दक्षिण मंडलातील शहरासह सर्व गावातील मंदिरासमोर भाजपच्यावतीने आंदोलने करण्यात आली.  


दार उघड उध्दवा दार उघड , तिघाडी सरकारचा निषेध असो, दारु दुकानांना परवानगी मग मंदिरे बंद का ? अशा घोषणांनी मंदिर परिसर दणाणून सोडला. बंद देवालये उघडी करण्यासाठी जनभावना तीव्र असुन राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याचा आदेश द्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.


 शहरातील दत्तचौक ,मलकापुर,कोयनावसाहत,जखिनवाडी, कापिल, गोटे, खोडशी, रेठरे बुद्रुक,मुंडे, चचेगाव, वाठार , काले, जुजारवाडी, येणके, मालखेड, कासारशिरंबे, मालखेड, येरवळे, कालवडे,

या गावामध्ये भाजपा पदाधिकार्‍यांसह नागरिकांनी आंदोलने केली.  

आंदोलनामध्ये शेखर चरेगावकर, तालुकाध्यक्ष पै.धनंजय पाटील,शहराध्यक्ष एकनाथ बागडी, समाधान चव्हाण,सरचिटणीस धनाजी माने , कोयनावसाहत सरपंच राजेंद्र पाटील, महेश कुलकर्णी,मलकापुर शहराध्यक्ष सुरज शेवाळे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष तानाजी देशमुख, किसान मोर्चाचे सुनिल शिंदे, दिपक लावंड,पोपट देसाई, रुपेश देसाई, प्रदिप डाईंगडे, श्रीकांत दमामे, तौफिक आगा, तसेच विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .