शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात अतिवृष्टी.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात अतिवृष्टी.
' वारणा धरणाच्या सांडव्या वरुन विसर्ग वाढविला, नदी पात्रात आठ हजार पाचशे क्युस्केस पाण्याचा विसर्ग.'
"नदी काठच्या गावांना धरण प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा."
शिराळा प्रतिनिधी
पावसाचे आगर म्हणुन संबोधल्या जाणार्या चांदोली परीसरात गेल्या पाच ते सहा दिवसा पासुन सलग अतिवृष्टी होत असून, शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासात धरण क्षेत्रात ७५ मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीच्या पावसाची नोंद वारणावती पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे.मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे धरणाच्या सांडव्यातुन वारणा नदी पात्रात सोडण्यात येणार्या पाण्याच्या विसर्गात शनिवारी सकाळी दहा वाजता वाढ करण्यात आली आहे. सध्या धरणाच्या सांडव्यातुन ७१०० क्युसेक्स तर विजगृहातुन १४०० क्यूसेक्स असे एकुण ८५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात आला आहे.त्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेरून वहात असुन नदी काठची भात व ऊस शेती पाण्याखाली गेली आहे तसेच पावसाचा जोर कायम राहील्यास वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होवुन वारणा नदीवरील आरळा-शित्तुर,चरण- सोंडोली हे पुल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे
सध्या धरणात २९.४५ टीएमसी पाणीसाठा झाला असून,धरण ८५.५९ टक्के भरले आहे मुसळधार पावसामुळे शिराळा तालुक्याच्या पश्चीम विभागातील मणदुर सोनवडे,आरळा,करुंगली सह येथील वाड्यावस्त्यांवरील शेतीची कामे ठप्प झाली आहेत.

Comments
Post a Comment