"रयतेचे स्वराज्य " प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम. " अभिनेत्री अश्विनी महांगडे सातारा जिल्हामधील गोरगरीब महिला व युवती साठी करणार मोठे सामाजिक कार्य."

 "रयतेचे स्वराज्य " प्रतिष्ठानचा अभिनव  उपक्रम.

"  अभिनेत्री अश्विनी महांगडे सातारा जिल्हामधील गोरगरीब महिला व युवती साठी करणार मोठे सामाजिक कार्य."

'महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांची घेतली भेट'

कराड  - प्रतिनिधी (ज्ञानेश्वर शेवाळे)
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान सामाजिक कार्यासाठी सतत प्रयत्नशील असते हीच परंपरा कायम राखत प्रतिष्ठानच्या माध्यमातून राणु आक्का फेम अश्विनी महांगडे सातारा जिल्हामधील गोरगरीब महिला व युवती साठी  मोठे सामाजिक कार्य करणार आहेत.
स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील राणु आक्का फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान संस्थे मार्फत गोरगरीब महिला युवती यांच्या प्रती सामाजिक कार्य राज्यात सुरू आहे सातारा जिल्ह्यातील देखिल हे कार्य सुरू ठेवण्यासाठी त्यांनी नुकतीच जिल्हा महिला बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांची भेट घेऊन सातारा जिल्ह्याची माहिती जाणून घेत चर्चा केली. वाई तालुक्यातील पसरणी येथील अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान च्या माध्यमातून राज्यात सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे असेच कार्य त्यांना सातारा जिल्ह्यात देखील करावयाचे असल्याने त्यांनी महिला बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांची भेट घेतली.

  सातारा : - महिला बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे व अभिनेत्री अश्विनी महांगडे भेट .

 


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .