मॅग फायनान्स कंपनी ला कोरोना योद्धा हा सन्मान.

   मॅग फायनान्स कंपनी ला कोरोना योद्धा हा सन्मान.



कराड -प्रतिनिधी (ज्ञानेश्वर शेवाळे )

लॉकडाउन च्या काळात  प्रशासकीय अधिकारी,  डॉक्टर,नर्स,आशा, अंगणवाडी सेविका, प्रत्येक व्यक्तीने, सामाजिक संस्थेने, केलेल्या कार्याची दखल घेऊन कराड येथील एस के फायनान्सेस सर्विस च्या वतीने कोरोना योद्धा हा सन्मान देण्यात आला या मध्ये फलटण येथील मॅग फायनान्स प्रा. लि कंपनी च्या कराड शाखेला कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले लॉकडाउन च्या काळात देखील या कंपनीने आपली सामाजिक बांधिलकी जपत बचत गटाच्या महिलांना मास्क चे वाटप केले होते. या कंपनीच्या माध्यमातून चांगली आणि पारदर्शक सेवा दिली जाते त्यामुळे अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या सन्माना बदल कराड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक दिप ज्योती पाटील, कंपनीचे संचालक अनिल मोहटकर, कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सुळ आदी अभिनंदन केले. कंपनी च्या वतीने ज्ञानेश्वर शेवाळे यांनी हा सन्मान स्विकारला.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .