खुजगांव पुन्हा कोविड विषाणूच्या विळख्यात.
खुजगांव पुन्हा कोविड विषाणूच्या विळख्यात.
"एका रुग्णाचा कोविड स्वॅब पॉझिटिव्ह."
शिराळा - प्रतिनिधी(आनंदा सुतार )
खुजगांव ता.शिराळा येथे पुन्हा कोविडचा शिरकाव झाला असुन. सदरच्या रुग्णाला निमोनिया झाल्याने कोल्हापुर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.कोविड तपासणी साठी स्वॅब घेतला असता त्याचा अहवाल आला असुन सदरचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.
सविस्तर वृत्त असे की, खुजगांव येथील सदर कोविड बाधित व्यक्ती डायलेसिसच्या उपचारासाठी कोल्हापुर येथे रितसर ई-पासने जात-येत होते. त्याप्रमाणे मंगळवार दि.०७ ऑगस्टला उपचारासाठी कोल्हापुर ला गेले होते. सोबत त्यांचा भाऊ व पत्नी होती.सदर रुग्णाला निमोनिया ची लक्षणे असल्याने त्यांचेवर कोल्हापुर येथे उपचार सुरु होते परंतु त्यावेळी त्यांना तिथे श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा अहवाल शनिवार दि.०८ ऑगस्टला प्राप्त झाला.
सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित कोविड बाधित व्यक्तीच्या अती जवळच्या संपर्कातील घरच्या सहा लोकांना शिराळा येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहात संस्थात्मक अलगिकरण केले असुन कमी धोका असणार्या इतर सहा जणांना गृह अलगिकरण करण्यात आले आहे.अशी माहीती सरपंच सौ.मंगल पोतदार यांनी दिली.
खुजगांव गावात भितीचे वातावरण तयार झाले असुन. खुजगांव येथील हा तिसरा रुग्ण आहे.तर या आगोदरचे दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असुन कोणताही धोका नाही.
तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण पाटील, कोकरुड वैद्यकीय अधिकारी डाॅ.विठ्ठल घुले , डाॅ.सुरेश जाधव,ग्रामसेविका आर.डी. पाटील, तलाठी मारुती सातपुते,सरपंच मंगल पोतदार, शेखर पोतदार,आरोग्य सहाय्यक डॉ.सुरज पाटील,आरोग्य सहाय्यक ए.एन.गरुड, आरोग्य सेवक एस.डी. देसाई,आरोग्यसेविका ए.एस.खराडे, आशा स्वयंसेविका मनिषा काबंळे, रुपाली सावंत,व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी गावात उपाय योजना सुरु केल्या आहेत. तर आरोग्य विभागाच्या वतीने ही गावात काळजी घ्या व सुरक्षीत रहा असा सल्ला देण्यात आला आहे.

Comments
Post a Comment