खुजगांव येथे गणेशोत्सव मंडळाचा यंदा सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय.
खुजगांव येथे गणेशोत्सव मंडळाचा यंदा सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय .
शिराळा - प्रतिनिधी(आनंदा सुतार)
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खुजगांव ता.शिराळा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी यंदा सार्वजनिक गणपती उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता 'देश हाच देव' मानुन यंदा गणेश उत्सव साजरा न करण्याचं सर्व मंडळानी एक मताने ठरवलं आहे. तसेच येणारा नवरात्रीच्या काळातही दुर्गामाता उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावात व परीसरात कोविडच्या रुग्णांची वाढती संख्या पहाता सर्व मंडळांच्या पदाधीकार्यांची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेवुन सर्वानु मते हा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मीयांनी आपापले सण साधेपणाने व शक्यतो घरात राहूनच साजरे करावेत, असं आवाहन प्रशासनाने सुरुवाती पासूनच केलं आहेच. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने अलीकडेच या विभागातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींन सोबत बैठकाही घेतल्या होत्या. या बैठकींमध्ये उत्सव नेमका कसा साजरा करायचा, मूर्तीची उंची किती असावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन कसे करावे, या संदर्भात चर्चा झाली होती व मंडळांना याबाबतचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अनेक मंडळांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून उत्सवात बदल करण्याचे निर्णय घेतले होते. यावेळी सर्व मंडळाचे अध्यक्ष व पदाधीकारी उपस्थितीत होते.

Comments
Post a Comment