टाळगाव येथे भारतीय जनता पार्टी कराड तालुका दक्षिण मंडलाच्या वतीने कोरोना योद्धाचा सन्मान .
टाळगाव येथे भारतीय जनता पार्टी कराड तालुका दक्षिण मंडलाच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान .
उंडाळे- प्रतिनिधी ,
टाळगाव येथे कोरोना योद्धाचा सन्मान भारतीय जनता पार्टी कराड तालुका दक्षिण मंडलाच्या वतीने करण्यात आला.टाळगाव ,शेवाळवाङी यागावात डाॅकटर, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस पाटील यांचे कोरोना काळातील योगदानाबदल पक्षाच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर प्रसंगी मा.अशोक पाटील. मा. चेअरमन सर्जेराव देसाई. शंकर जाधव. दादासाहेब सपकाळ व पोलीस पाटील. मा.निवास सपकाळ. आदी मान्यवर उपस्थित होते.



Comments
Post a Comment