ओंडोशी येथे संजय नांगरे यांचे मार्फत स्वाध्यायपुस्तिका व शैक्षणिक साहित्याचे वाटप.
ओंडोशी येथे संजय नांगरे यांचे मार्फत स्वाध्यायपुस्तिका व शैक्षणिक साहित्याचे वाटप.
उंडाळे-प्रतिनिधी (प्रदिप पाटील)
कोविड-19 मुळे शाळा बंद आहेत . त्यामुळे शाळा बंद शिक्षण चालू उपक्रमा अंतर्गत ओंडोशी शाळेचे मुख्याध्यापक संजय नांगरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओंडोशी येथील शाळेतील सर्व मुलांना मराठी, गणित, इंग्रजी विषयांच्या एकत्रित आसणा-या स्वाध्यायपुस्तिकेचे व लेखन साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
सध्या शाळा बंद आहेत या काळात शिक्षण बंद राहू नये विद्यार्थ्यांची खरी गरज ओळखून आॕनलाइन शिक्षणा बरोबरच आॕफलाइनही शिक्षण चालू राहावे यासाठी संजय नांगरे यांनी सर्व मुलांना इयत्तावार 'अनुज प्रकाशन' निर्मित ज्ञानरचनावादावर आधारित , मुलांना स्वतः सोडवता येईल अशा स्वाध्यायपुस्तिकेचे व लेखन साहित्य किटचे वाटप केले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्याचबरोबर सरपंच सुनिल मोरे यांनी शब्दतरंग प्रश्नसंचाचे प्रत्येक विद्यार्थांस वाटप केले.
यावेळी केंद्रप्रमुख सदाशिव आमणे यांनी कोविड-19 च्या काळातही उपयुक्त उपक्रम राबवत असलेबद्दल शिक्षकांचा व व्यवस्थापन समितीचा गौरव केला. त्याचबरोबर त्यांनी ओंड केंद्र समूहात शाळा बंद शिक्षण चालू उपक्रमा अंतर्गत आॕनलाइन चाललेल्या टेस्टची सर्वांना सखोल माहिती दिली. व या टेस्टस् 100% मुले कशी सोडवतील यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
ओंड केंद्र समूहात आॕनलाइन टेस्ट हा विशेष उपक्रम सुरु केलेबद्दल केंद्रप्रमुख सदाशिव आमणे यांचा सत्कार व गौरव करण्यात आला.
सरपंच सुनिल मोरे , केंद्रप्रमुख सदाशिव आमणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. सुनिता चोरमाले, निरंजन शिंदे, जितेंद्र मोरे, जयकर शिंदे,लक्ष्मण हणबर, संजना पोळ, शंकर शिंदे, सविता मोहिते, महेंद्र फसाले, रेखा पवार, सुशांत थोरात, सिंधू चोरमाले, कविता मोहिते, उज्वला फसाले आदि उपस्थित होते. सदर प्रसंगी मुख्याध्यापक संजय नांगरे यांनी स्वागत व प्रास्तविक तर सूत्रसंचालन व आभार संदिप गुळवे यांनी केले.

Comments
Post a Comment