साईसम्राट इन्स्टिट्यूट कडून ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्ष लागवड व वाटप.
साईसम्राट इन्स्टिट्यूट कडून ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्ष लागवड व वाटप.
"पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी, जीवित सर्व आत्म्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्ष लागवड व संगोपन अत्यावश्यक बाब "___धैर्यशील पाटील.
कराड - प्रतिनिधी.
पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी, जीवित सर्व आत्म्यांचा अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्ष लागवड व संगोपन अत्यावश्यक बाब आहे.
जंगलतोड रोखून जल व्यवस्थापन केल्यास पुढील भविष्य शास्वत होऊ शकते असे मत साईसम्राट इन्स्टिट्यूट, सुपर्ब चहा व विविध उद्योगाचे मार्गदर्शक विश्वस्त धैर्यशील पाटील यांनी पेठ, नेर्ले परिसरातील शेतकऱ्यांना संबोधले.
धैर्यशील पाटील म्हणाले अमेरिका,युरोप या खंडांमध्ये प्रती माणसी १२०० झाडे आहेत, साऊथ एशियन कंट्री मध्ये प्रती माणसी ९० झाडे आहेत व भारतामध्ये प्रती माणसी ५२ झाडे आहेत.
अमेरिका, युरोप खंडांमध्ये जंगल व जल याला राष्ट्रीय संपत्ती मानली जाते.
आणि पर्यावरणाचा नैसर्गिक आपत्ती व जागतिक तापमानवाढ यांच्यातून वाचवण्यासाठी वृक्ष लागवड व संगोपन केल्याशिवाय पर्याय नाही. विलास झाडे म्हणाले साईसम्राट इन्स्टिट्यूटने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत वाटचाल सुरू ठेवली आहे.
प्रा. मंदाकिनी झाडे म्हणाल्या जल व जंगल याबाबतीत भावी पिढीने जागृत होणे गरजेचे आहे . शिवाजी जाधव म्हणाले साईसम्राट इन्स्टिट्यूटने सालाबाद प्रमाणे उच्च दर्जाची फळ वृक्षांची कलमे देऊन आपले पृथ्वीवरचे पर्यावरणावरील प्रेम कायम राखले आहे. शेतकरी उत्पादक हणमंत माने म्हणाले वृक्ष लागवड व संगोपन ही शेतकरी कष्टकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे . यावेळी संचालक प्रा.विजय जाधव,ऑपरेशन हेड विक्रांत, प्रा. सलिल खोडे,विक्री प्रमुख अमृता यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विश्वास माळी,चंद्रकांत माने,दिपक माळी,शिवाजी जाधव,अमोल माने, पेठ, नेर्ले परिसरातील ग्रामस्थ, साईसम्राट इन्स्टिट्यूटचे शिक्षक स्टाफ ओम साई फुड्स चे कर्मचारी उपस्थित होते.
साईसम्राट इन्स्टिट्यूट कडून स्वातंत्र्य दिनानिमित्त पेठ,नेर्ले परिसरातील शेतकरी उत्पादकांना आंबा, पेरू ,फळ वृक्षांचे वाटप करताना विश्वस्त धैर्यशील विजयसिंह पाटील, विलास झाडे ,सम्राट विजयसिंह पाटील व ग्रामस्थ प्रतिनिधी .


Comments
Post a Comment