सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर , लोकांना सोशल डिस्टन्ससिंगचा विसर .

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर , लोकांना पडलाय  सोशल डिस्टन्ससिंगचा  विसर.





 उंडाळे -प्रतिनिधी (प्रदिप पाटील )

कोरोनाचा विळख्यात संपूर्ण जग सापडलेले आहे,त्याच बरोबर देशात , राज्यात परिस्थिती गंभीर बनते आहे . सातारा जिल्ह्यामध्ये दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार कलम १४४ लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांना गर्दी करण्यास सक्त मनाई आहे. तरीही नागरिक शासनाच्या सचारबंदीला धुडकावून मुक्त संचार करीत आहेत.

कराड तालुक्यातील दररोज शेकडो रूग्ण बाधित येत आहेत. कराड तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणुन येळगाव ,ओंड व उंडाळे कडे प्रामुख्याने पाहिले जाते मात्र मागील काहि दिवसामध्ये येळगाव पाठोपाठ ओंड मध्येही बाधीत रूग्ण आढळल्याने संबंधित गावांनी पुर्ण खबरदारी घेतली आहे,तर ओंड कोरोना कमिटीने 11आँगस्ट पासुन बेमुदत लॉकडाउन केले आहे. 

  तालुक्यातील महत्वपुर्ण बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या दोन गावात दुकान व्यवसायिक , भाजीपाला विक्रेत्यांना प्रतिबंध करण्यात आला असल्याने सध्या या भाजीपाला विक्रेते, व्यवसायिक व खरेदी करणारे ग्राहक सध्या ' उंडाळे कडे मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहेत. मात्र भाजीपाला खरेदी करताना नागरिक सोशल डिस्टन्सिंग न बाळगता मोठ्या प्रमाणात गर्दी केली. गर्दी टाळण्यासाठी स्थानिक पदाधिकारी व संबंधित पोलीस विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने जागरूक नागरिकांनी यावर रोष व्यक्त केला आहे. 

  कराड - रत्नागिरी महामार्गवर उंडाळे बसस्थानकावर रस्त्याच्या दोन्ही बाजुस वेगवेगळे दुकान व्यवसायिक आहेत ,मात्र संबंधित व्यापाऱ्यांकडुन सुरक्षिता पाळली जात नसुन सोशल डिस्टन्सिंगचा आभाव दिसुन येत आहे. तर रस्त्याच्या दुर्तफा असणाऱ्या फुटफाटवर भाजीपाला व्यवसायिकांनी पाले ठोकुन व्यवसाय करत सोशल डिस्टन्सिंगचा पुर्ण फज्जा उडवलेल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.भाजीपाला घेण्यासाठी शेकडो नागरिकांनी कोणतीही सुरक्षितता न बाळगता मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे कोरोना व्हायरस पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकार घडत असताना उंडाळे ग्रामपंचात , कोरोना कमिटी व पोलिस प्रशासनाकडुन मात्र कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.


संबंधित  पोलीस प्रशासन या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने उंडाळे परिसरातील नागरिक सोशल डिस्टन्सिंग न बाळगता मुक्त संचार करीत असुन विनाकारण चौका-चौकात नागरिकांची गर्दी दिसुन येत आहे। नागरिकांवर पोलिस विभागाचा कोणताही वचक नसल्याने महत्त्वाचे काम नसतानासुद्धा नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत.


भाजीपाला, किराणा, औषधी आदी वस्तू जीवनावश्यक वस्तू असल्याने नागरिकांना खरेदी करणे आवश्यक आहे मात्र वस्तू खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंग ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. भारत देशासह संपूर्ण जगात कोरोणा व्हायरसने कहर केला आहे. नागरिक घराबाहेर न पडता दहशतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत. तर दुसरीकडे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. आपल्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्या लोकांचा जीव धोक्यात घालत आहेत. नागरिकांनी जागरूकता बाळगली नाही तर संसर्गाचा धोका आहे. 

संबधित आजाराचा धोका लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा व्यापारी व नागरिकांच्याकडे आग्रह धरला पाहीजे या उलट परिस्थिती पाहावयास मिळत आहे त्यांच्याकडे पुर्ण डोळेझाक केल्याचे चित्र असुन शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यांच्यावर वरिष्ठ प्रशासनाने दखल घेत योग्य ती कारवाईची मागणी जागरुक नागरिकांनमधुन केली जात आहे.

आर्थिक  व्यवहार करण्यासाठी बँकेतून पैसे काढण्यासाठी आलेले बँकेचे ग्राहक या पद्धतींन शोशल डिस्टन्ससिंग पाळताना.  

सोशल डिस्टन्स सिंग व शासनाच्या नियमावलीचा बोजवारा. 

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .