शिराळा शहरात कृत्रिम गणेश विसर्जनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी नागरिकांचा चांगला प्रतिसाद.
शिराळा शहरात कृत्रिम गणेश विसर्जनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी, नागरिकांचा चांगला प्रतिसाद.
शिराळा- प्रतिनिधी (आनंदा सुतार)
शिराळा शहरांमध्ये दिवसें दिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून शहरामध्ये गणेश उत्सव सणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी नगरपंचायतीने शहराच्या प्रमुख ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. नागरिकांनी याचा पुरेपूर वापर केला असून हा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी झाला आहे.
शिराळा येथील घुमट वस्ती- होळीचे टेक येथील कृत्रिम गणेश मूर्ती विसर्जन तळ्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील, उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील, नगरसेवक उत्तम डांगे, सिमा कदम यांच्या उपस्थितीत झाले. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.शिराळा शहरांमध्ये कृत्रिम गणेश विसर्जन स्थळांचा पहिल्यांदाच प्रयोग नगरपालिकेने केला असल्याचे सांगितले. शहरातील नागरिकांनी व महिलांनी याचा पुरेपूर वापर करून प्रदूषण टाळण्याचे आवाहन केले.
महिलांनीही गौरीचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तळ्याचा वापर करून शहरांमध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला. शहरात कोरोनाच्या आजारापापसून संरक्षण होणे हा उद्देश असून या उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्यांना शिराळा नगरपंचायतमार्फत गौरवपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
यावेळी सुभाष इंगवले, जयसिंग गायकवाड, श्रीरंग गायकवाड, संभाजी गायकवाड, आनंदा नलवडे, शंकर कदम, माणिक कदम, सुवर्णा नलवडे, शितल गायकवाड, अनुराधा शिंदे, निलम गायकवाड, नंदा नलवडे, दर्शन डांगे, टी. एम. गायकवाड, महेंद्र कांबळे, बासूद्दीन मुल्ला, काजल गायकवाड, दुर्गा गायकवाड, श्रंद्धा गायकवाड, वेदिका गायकवाड, स्वरांजली नलवडे आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment