तत्वाशि ठाम राहिलेले नेतृत्व- स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब

   तत्वाशि ठाम राहिलेले नेतृत्व- स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब


आनंदा सुतार शिराळा, सांगली प्रतिनिधी

 राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन गोरगरिबांसाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व म्हणून स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांच्याकडे पाहिले जात होते त्यांनी आयुष्यभर पक्षनिष्ठा जोपासत राजकारणात राहून अनेकांच्या सोबत अजातशत्रू असे नाते निर्माण करण्यात ते राज्यात यशस्वी ठरले होते.त्यांनी वसंतदादांचे राजकीय वारसदार म्हणून आपली ओळख निर्माण केली होती अशा या व्यक्तिमत्वाला ८५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन साहेबांनी डोंगरी परिषद घेऊन अनेक तालुक्यांना डोंगरी विभागाचा लाभ मिळवून दिला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक खात्याचे प्रभावीपणे काम केले त्यांनी विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून वेगळी छाप निर्माण केली होती त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते गौरविण्यात आले होते अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या ते सदस्य राहिले होते एक निष्ठावंत नेता म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत ओळख निर्माण केली त्यांचे मुंबईत असणारे वास्तव्य हे अनेक कार्यकर्त्यांसाठी ताकत होती ते  आता आपल्यात नाहीत याची पुसटशी कल्पनाही आपल्याला करवत नाही. सांगली जिल्ह्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही योगदान दिले त्या योगदान देणाऱ्या या यादीत साहेबांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो ते मितभाषी व उच्चशिक्षित होते १९६७ पासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास २०१९ मध्ये थांबला. त्याचा सुरुवातीपासून ते शेवट राजकीय संघर्ष नेहमी संयमी विचारी राजकारणी म्हणून राहिला राजकीय नेता कसा असावा तर तो साहेबांच्या सारखा असावा असा अजूनही आवर्जून उल्लेख केला जातो. ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे राजकारणात विचार धारेशी ठाम राहिले नेतृत्व म्हणून साहेबांचा सर्वांना अभिमान आहे वंचित घटकांशी त्यांची अस्था कायम राहिली. विरोधात गेलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी कधीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाही त्यांच्या डोंगरी विभागाच्या या निर्णयामुळे शिराळ्यासह इतर अनेक तालुक्यातील असंख्य मुलांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाल्या पोलीस दल, परिवहन महामंडळात त्यांच्यामुळे अनेकांना कार्यरत राहता आले. त्यांच्यामुळेच शिराळा तालुका डोंगरी तालुका म्हणून गणला जाऊ लागला वारणा धरणाच्या मुख्य कालव्यावरील उपसिंचन योजना त्यांनी मंजूर करून आणल्या त्याची पूर्तता व्हावी म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले मात्र सरकारमधील तत्कालीन परिस्थिती अडचणीची ठरली साहेबांनी स्वतःच्या कार्य कर्तुत्व आणि इच्छाशक्तीवर स्वतःचे असे विश्व निर्माण केले. त्या विश्वाचा आधार अनेकांना मिळाला त्यांच्यात पाठबळावर अनेकांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली कोल्हापुरातील राजाराम कॉलेजचे विद्यार्थी ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती असा त्यांचा प्रवास राहिला. आमदार मंत्री म्हणून जी जबाबदारी मिळेल त्याला त्यांनी वैश्विक अधिष्ठान प्राप्त करुन दिले उत्कृष्ट संघटक म्हणून त्यांची ख्याती होती म्हणूनच तर काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती महाराष्ट्राच्या राजकारणात कोकरूडच्या या सुपुत्राची यापुढील काळात उणीव कायमच भासणार आहे. साहेबांनी राजकारणात राहून स्वतःलाही जपले आणि जनतेलाही ...साहेब म्हणून जे प्रतिभासंपन्न नेतृत्व होते. त्यांच्या सारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही. अशा या "माणसातल्या देव माणसाला" विनम्र अभिवादन.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .