चांदोली धरणाच्या चार ही दरवाजातुन नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु .
अखेर चांदोली धरणाच्या चार ही दरवाजातुन नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु
"धरणाच्या सांडव्यावरुन ३००० व विजनिर्मिती कडून १४०० एकूण ४४०० क्युस्केस विर्सग वारणा नदीत पात्रात सुरू. "
आनंदा सुतार / शिराळा सांगली प्रतिनिधी
वरुण राजाच्या बर्याच दिवसाच्या विश्रांती नंतर चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग चौथ्या दिवशी अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे गुरुवारी दुपारी तीन वाजता खुले करण्यात आले आहेत. वक्राकार दरवाजातून तीन हजार व विजनिर्मिती कडून चौदाशे क्युस्केस असा चार हजार चारशे क्युस्केस विर्सग वारणा नदीत पात्रात सुरू असुन. नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी असा इशारा वारणा पाटबंधारे वारणावती विभागाचे शाखाधिकारी टि.एस. धामणकर यांनी दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याचे पश्चिम भागातील चांदोली हे राज्यातील मातीचे दोन नंबरचे धरण आहे.सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील सरहद्दीवर असणारे ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे हे धरण सध्या २८.१२ टिएमसी भरलेअसुन याच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवसान पासुन अतिवृष्टी होत आहे. सध्या अतिवृष्टी व मुसळधार पाऊस सुरूच आहे. चार दिवस धुवाॅधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातुन २२१२० क्युस्केस पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
बुधवारी धरणातील पाण्याने सांडवा पातळी पार केली. चारही वक्राकार दरवाजे गुरुवारी दुपारी तीन वाजता खुले करण्यात आले असुन चार ही दरवाजातून
पाण्याचा विसर्ग ३००० क्युस्केस तर विजनिर्मीती केंद्रातुन १४०० क्युसेक्स असा ४४०० क्युस्केस प्रति सेंकद वारणा नदीत पात्रात विसर्ग सुरु असुन
गेल्या २४ तासात सर्वांधीक वारणावती पर्जन्य मापन केंद्रावर १६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असुन मुसळधार पावसामुळे व धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. पाणलोट क्षेत्रातुन २२१२० क्युस्केस पाण्याची आवक होत आहे त्यामुळे धरणाचे दरवाजे गुरुवारी दुपार पासून खुले करण्यातआले आहेत.
🔺 अखेर चांदोली धरणाच्या चार ही दरवाजातुन नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु.
https://youtu.be/TigMKLfjV90

Comments
Post a Comment