साळशिरंबे गावातील सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय सर्व गणेश मंडळांच्या वतीने घेण्यात आला.
साळशिरंबे गावातील सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय सर्व गणेश मंडळांच्या वतीने घेण्यात आला.
साळशिरंबे - प्रतिनिधी,
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन साळशिरंबे गावातील सर्व गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मा.दिपज्योती पाटील (पो.उनि.उंडाळे पोलीस स्टेशन) यांच्या प्रमुख उपस्थित, सरपंच मा.तात्यासाहेब पाटील, उपसरपंच, मा.तानाजी साठे, तंटामुक्ति समिती अध्यक्ष मा.रमेश पाटील, पोलीस पाटील मा.उमा पाटील माजी तंटामुक्ति उपाध्यक्ष मा.पंकज पाटील व गावातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment