चांदोली धरणातुन विसर्ग केला कमीः आरळा-शित्तुर,चरण-सोंडोली पुल खुले
चांदोली धरणातुन विसर्ग केला कमीः
आरळा-शित्तुर,चरण-सोंडोली पुल खुले
आरळा-शित्तुर,चरण-सोंडोली पुल खुले
शिराळा- प्रतिनिधी (आनंदा सुतार)
चांदोली धरण परीसरात पावसाने उघडीप दिल्यामुळे डोंगर माथ्यावरुन चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणार्या पाण्याची आवकही कमी झाली आहे त्यामुळे चांदोली धरणातुन वारणा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या सांडव्यातुन १६२६ क्युसेक्स तर वीजनिर्मीती केंद्रातुन १३६९ क्युसेक्स असे एकुण २ॅ९९५ क्युसेक्स पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
चांदोली परीसरात गेल्या आठवड्यात दमदार पाऊस कोसळत होता त्यामुळे धरणाच्या सांडव्यातुन वारणा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्गही वाढविण्यात आला होता त्यामुळे चांदोली परिसरात पुरस्थिती निर्माण झाली होती वारणा नदीचे पाणी नदी काठच्या ऊस भात पाकांमध्ये शिरले होते तसेच वारणा नदी वरील आरळा-शित्तुर ,चरण-सोंडोली हे पुलही पाण्याखाली जावून जनजीवन विस्कळीत झाले होते याच बरोबर सोनवडे,चरण येथील स्मशान शेडमध्ये ही पुराचे पाणी शिरले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासुन परीसरात पडणार्या पावसाचा जोर मंदावला असल्याने धरणातुन सोडण्यात येणारा विसर्गही कमी करण्यात आला आहे त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत घट होवु लागली आहे.तसेच पुराच्या पाण्याखाली गेलेले आरळा-शित्तुर,चरण-सोंडोली, बिळाशी भेडसगांव हे पुलही खुले झाले आहेत.
चांदोली परीसरात आज पावसाची उघडझाप सुरु असुन काल सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात चांदोली धरणक्षेत्रात १२ मिलीमीटर पावसासह आजअखेर या परीसरात २१४९ मिलीमीटर इतक्या एकुण पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्य मापन केद्रावर झाली आहे.सध्या धरणाची पाणीपातळी ६२४.७० मिटर इतकी असुन चांदोली धरणामध्ये ३१.६७ टी.एम. सी म्हणजेच ९२.०४ टक्के इतका पाणीसाठा आहे.

Comments
Post a Comment