मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी येथे अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा
मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी येथे अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा.
शिराळा - प्रतिनिधी (आनंदा सुतार)
आनंदराव पाटील मिस्त्री यांचा वाढदिवस मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी येथे अनोख्या पद्धतीने मान्यवरांच्या उपस्थित साजरा झाला. वाढदिवसाचा तसेच त्यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झालेनंतर होणार सत्कार संभामारंभ यावरील अनावश्यक खर्च टाळून
मल्लविद्या कुस्ती केंद्रातील गोरगरीब व मेहनती मल्लांना दहा किलो बदाम व तुप आनंदराव पाटील यांच्याकडून वाटप करण्यात आले. यावेळी पाटील म्हणाले आपण ही समाजासाठी काही तरी देणे लागतो याच भावनेतुन व कुस्ती मल्लविद्या महासंघ संस्थापक पै.गणेशराव मानुगडे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती मल्लविद्या महासंघातील प्रत्येक पदाधिकारी नेहमीच असे नवनवीन उपक्रम राबवत असतात. अनेक मल्लांच्या घरची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत असते अनेकवेळा खुराकासाठी पैसे उपलब्ध होत नाहीत त्यामुळे कुस्ती मेहनतीवर परिणाम झालेला दिसून येतो. हिच बाब लक्षात घेऊन कुस्ती मल्लविद्या महासंघ कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष मा.आनंदराव पाटील मिस्त्री यांनी निवडीच्या व वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन लाल मातीची सेवा आपल्या हातून घडावी या उद्देशाने मल्लविद्या कुस्ती केंद्रातील नवोदित मल्लांना दहा किलो बदाम वाटप केले. आनंदराव पाटील यांचे कुस्ती क्षेत्रीतील योगदान मोलाचे आहे. अनेक मल्लांना त्याची नेहमी मदत असते. ग्रामीण भागातील कुस्ती व ग्रामीण भागातील मल्ल जागतीक पातळीवर चमकावेत यासाठी मिस्त्री नेहमीच प्रयत्नशील असतात. गतवर्षी सुध्दा मिस्त्री यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मल्लविद्या कुस्ती केंद्रात वृक्षारोपण केले होते.याच बरोबर प्रत्येक वर्षी न चुकता एक दिवसा साठी सांगली कोल्हापुर सातारा या जिल्ह्यात फ्रि चेक कॅप कोणताही मोबदला न घेता ही संकल्पनाही ते राबवत आहेत याच बरोबर या कुस्ती केंद्रातील मल्लांना नेहमीच अशा दानशुर मंडळीन कडुन भरघोस मदतीचा हात पुढे येत आहेत याच केंद्रातील स्विकार सावंत या मल्लास सुरेश रांजवंण यांनी दत्तक घेवुन त्याला मानधन सुरु केले आहे तसेच दिपक दादा पाटील यांनीही या प्रसंगी दहा किलो तुप देवु केले कुस्ती साठी अशा दानशुर व्यक्तीमत्वाची खरोखर गरज आहे.
जगावर कोरोना महामारीचे संकट आहे यातुन कोणीही सुटलेले नाही या संकटात स्वत:चे आरोग्य धोक्यात घालुन जागतिक महामारीत सर्वतोपरी मदत व सेवा केल्याबद्दल कुस्ती मल्लविद्या महासंघ राज्य उपाध्यक्ष पै.राहुल जाधव आणि कुस्ती मल्लविद्या महासंघ कोल्हापुर जिल्हाध्यक्ष मा.आनंदराव पाटील यांना ग्रामीण पञकार संघ सलग्न प्रेस क्लब आॅफ शिराळा यांच्या वतिने कोरोना योध्दा सन्मानपञ प्रेस क्लब आॅफ शिराळा चे अध्यक्ष मा.विनायक गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी सांगली जिल्हा भाजपा युवा उपाध्यक्ष मा.प्रतापसिंह चव्हाण , प्रेस क्लब आॅफ शिराळाचे अध्यक्ष मा.विनायक गायकवाड , काष्ठशिल्पकार चिञकार पै.अशोक जाधव सर , नारायण घोडे,प्रतापराव शिंदे , आनंदा सुतार , बाजीराव घोडे , बाजीराव शेडगे दादा,
कुस्ती मल्लविद्या तालुका प्रवक्ते मा.विकास शिरसट , कार्यवाहक पै.विकास शेडगे ,पैहेलवान सहाय्यता कक्ष प्रमुख पै.राहुल पाटील व नवोदीत मल्ल आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments
Post a Comment