कोडोली गावात सार्वजनिक गणेश उत्सव रद्द करण्याचा एक मुखी निर्णय .

 

 कोडोली गावात सार्वजनिक गणेश उत्सव रद्द  करण्याचा एकमुखी निर्णय .

कार्वे- प्रतिनिधी.

कोरोना प्राद्रुभाव रोखण्यासाठी व गाव सुरक्षित ठेवण्यासाठी कोडोली गावातील सर्व युवकांचे एक पाऊल पुढे.गावातील या वर्षीचा सार्वजनिक गणेश उत्सव रद्द करण्याचा एक मुखी निर्णय घेऊन ,कोडोली गाव कोरोना विरूद्धच्या लढाईत गावातील एकजूट दाखवुन इतर गावान आदर्श दाखवुन दिला.गेली चार महिने झाले पोलिस प्रशासनावर जो ताण आहे.त्यांनी आव्हान केल्या नुसार एक गाव एक गणपती .त्याला प्रतिसाद देत कोडोली गावातील सर्व गणेश मंडळणी पोलिस प्रशासनावरती जो ताण आहे तो कमी करण्यासाठी व कोरोना प्रद्रुभाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.पोलिस प्रशासनाने या निर्णयाचे स्वागत करून ,सर्व मंडळांचे अभिनंदन केले.त्याच बरोबर कोडोली ग्रामपंचायत,पोलिस पाटील ,व दक्षता कमिटी यांच्या कडून.सर्व गणेश मंडळांचे जाहीर आभार.वडगाव हवेली दूर क्षेत्राचे पीएसआय दळवी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मीटिंग घेण्यात आली त्याच्यात हा निर्णय घेण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .