पावसाचा जोर ओसरला चांदोली धरणातुन पाण्याचा विसर्ग कमी केला

 पावसाचा जोर ओसरला चांदोली धरणातुन पाण्याचा विसर्ग कमी केला.

शिराळा -प्रतिनिधी ( आनंदा सुतार)

           पावसाचे आगर म्हणून संबोधल्या जाणार्‍या चांदोली धरण परिसरात आज सकाळपासुन  पावसाचा जोर मंदावला असल्यामुळे  चांदोली धरणाच्या  सांडव्यातुन वारणा नदी पात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आज दुपारी कमी करण्यात आला आहे त्यामुळे वारणा नदीची पाणी पातळी हळु हळु कमी होवु लागली आहे

  चांदोली  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील सलग पाच दिवस अतिवृष्टी झाली होती त्यामुळे चांदोली धरणाच्या सांडव्यातुन गुरुवार पासुन विसर्ग सुरु करण्यात आला होता त्यानंतर या परीसरात पावसाचा जोर वाढतच राहील्याने विसर्गही वाढविण्यात आला होता मात्र आज सकाळपासुन पावसाने परीसरात उघडीप दिली आहे तसेच चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  येणार्‍या  पाण्याची आवक कमी झाल्याने आज दुपारपासुन धरणाच्या सांडव्यातुन वारणा नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असुन सध्या धरणाच्या सांडव्यातुन ११४३ क्युसेक्स तर वीजगृहातुन १३७४ क्युसेक्स  असे एकुण २५१७  क्यूसेक्स पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .