प्रकाश हाॅस्पिटल मध्ये पहीला कोरोना रुग्ण उपचारासाठी दाखल.

 प्रकाश हाॅस्पिटल मध्ये पहीला कोरोना रुग्ण उपचारासाठी दाखल.

 शिराळा -प्रतिनिधी (आनंदा सुतार)

 शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील ५८ वर्षीय पुरुषाची कोविड टेस्ट पाॅझिटीव्ह आल्याने शुक्रवारी दुपारी ४ वाजता उरुण- इस्लामपुर येथील प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मध्ये  उचारासाठी दाखल झाला हा कोविड पाॅझिटीव्ह रुग्ण उपचारासाठी आलेला प्रकाश हाॅस्पिटल मधील पहीला  रूग्ण असुन हाॅस्पिटल मध्ये तात्काळ ॲॅडमिट करून सदर रूग्णांवर उपचार सुरु करण्यात आल्याची माहीती हाॅस्पिटल व्यवस्थापनाने दिली. बुधवार दि.५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता सदर रुग्णाच्या हातापायाला गोळे येणे व धाप वाढुन शारीरीक त्रास सुरू झाला म्हणुन उपजिल्हा रुग्णालय शिराळा येथे उपचारासाठी दाखल झाला गुरुवार दि.६ ऑगस्ट ला कोविड टेस्ट घेण्यात आली व त्याचा रिपोर्ट शुक्रवारी दुपारी कोविड पाॅझिटीव्ह आल्याने सदर रूग्णाला पुढील उपचारासाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयातुन उरूण- इस्लामपुर येथील प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मध्ये पाठविण्यात आले .सांगली जिल्ह्यातील वाढती कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने उरुण - इस्लामपुर शहरातील प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मध्ये कोविड रुग्णांच्या उपचाराचे सेंटर सुरु केले आहे,यामुळे जिल्हा स्तरावरील कोविड रुग्णांच्या उपचार सेंटर वरील ताण कमी होणार आहे.वाळवा,शिराळा,पलुस,कडेगांव,तासगांव तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील कोविड  रुग्णांसाठी हे हाॅस्पिटल आधार ठरणार आहे.प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर व त्यामधील सर्व वैद्यकीय तज्ञ कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सज्ज झाले असुन रुग्णांच्या उपचाराबरोबर प्रत्येक रूग्णांस गरम पाण्यासाठी थर्मास,शारीरीक प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने योग्य आहार,च्यवनप्राश,आयुष काढा,आयुष हेल्थ वटी,एलसिडी प्रोजेक्टव्दारे योगा,प्राणायम प्रसारीत करुन त्याचे प्रशिक्षण ॲडमिट रुग्णांना दिले  जाणार आहे याचबरोबर स्लिपर (चप्पल),ब्लॅन्केट,बेडसिट,ट्युथपेस्ट,ब्रश,साबण,कंगवा,पावडर आदी सुविधा प्रकाश  हाॅस्पिटल व्यवस्थापनाकडुन पुरविल्या जात आहेत.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .