Posts

Showing posts from September, 2020

पुनवत येथील जवानाचे त्रिपुरा येथे निधन

Image
  पुनवत येथील जवानाचे त्रिपुरा येथे निधन. शिराळा-  प्रतिनिधी           पुनवत ता शिराळा येथील बीएसएफ चे जवान नानाश्री भगवान माने वय ३० यांचे त्रिपुरा राज्यातील आगरतळा येथे सेवा बजावत असताना अल्पशा आजाराने  सोमवार दि २८ रोजी निधन झाले .त्यांच्या निधनाने पुनवत गावावर शोककळा पसरली आहे .           जवान नानाश्री माने हे बीएसएफ च्या १३३ बटालियन मध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते २००९ मध्ये त्यांनी या सेवेचा आरंभ केला होता .काही दिवसांपूर्वी ते गावी सुट्टीवर आले होते .     सोमवार दि २८ रोजी सकाळी ड्युटीवर असताना त्यांची तब्बेत अचानक बिघडली .त्यानंतर त्यांना मिल्ट्रीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले .मात्र उपचार सुरू असताना रात्री सव्वाआठच्या सुमारास त्यांचे निधन झाले अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.   माने यांच्या पश्चात आई, पत्नी, लहान मुलगा, दोन बहिणी, चुलते असा परिवार आहे .त्यांच्यावर पुनवत ता.शिराळा येथे त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

वाकुर्डे योजनेसाठी ज्या शेतकऱ्याच्या जमिनी संपादित झाल्या आहेत त्यांना जमिनीचा शासकीय दरापेक्षा २५ टक्के जादा मोबदला मिळवून देणार.

Image
  वाकुर्डे योजनेसाठी ज्या शेतकऱ्याच्या जमिनी संपादित झाल्या आहेत त्यांना जमिनीचा शासकीय दरापेक्षा २५ टक्के जादा मोबदला मिळवून देणार. शिराळा  - प्रतिनिधी( आनंदा सुतार) वाकुर्डे योजनेसाठी ज्या शेतकऱ्याच्या जमिनी संपादित झाल्या आहेत त्यांना जमिनीचा शासकीय दरापेक्षा २५ टक्के जादा मोबदला मिळवून देणार, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.  येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रांताधिकारी नागेश पाटील प्रमुख उपस्थित होते.  आमदार नाईक म्हणाले, वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी ५९७ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी सुमारे १६ कोटी रुपये आले आहेत. शासकीय दराने मिळणारा मोबदला रक्कमेपेक्षा शेतकऱ्यांनी खाजगी वाटाघाटी केल्यास या रक्कमेपेक्षा २५ टक्के रक्कम जादा मिळू शकते. हा शेतकऱ्यांचा फायदा करून देण्यासाठी शेतकऱ्यांशी गावावर संवाद साधणार आहे. यावेळी महसूल व वारणा कालवे विभागाचे अधिकारी सोबत असतील. तसेच या वेळी कालव्या संदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी असल्यास त्याही दूर केल्या जातील. शिराळा डोंग...

सत्यजित पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी.

Image
  सत्यजित पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. कराड - प्रतिनिधी (सारिका मंडले)   कोरोनो सारख्या महाभयंकर विषाणू ने अख्या जगात थैमान घातले आहे महाराष्ट्रात तर कोरोनो ने विळखा घातला आहे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बहुतांशी गावात कोरोनो ने शिरकाव केला असून तालुक्यातील कोव्हीड ची सर्व हॉस्पिटल रुग्णांनी फुल आहेत याचाच विचार करून कराड येथील सत्यजित पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जपत संस्थेचे संस्थापक पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांच्या सहकार्याने त्यांच्या पंचायत समिती गणातील  सर्व गावात अॉक्सीजन किट चे वाटप करण्यात आले त्यानी हा राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे याचा आदर्श इतरही पंचायत समिती सदस्य यांनी घेण्यासारखा आहे  सत्यजित पतसंस्थेच्या माध्यमातून नेहमीच गोरगरीबांना मदतीचा हात दिला जातो सद्या च्या परिस्थितीत देखील सर्व सामान्यांना हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले जात आहेत त्या साठी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांनी स्वतः हुन या कडे लक्ष दिले आहे त्यांनी वारूंजी, खोडशी सह त्यांच्या गणातील सर्व गावात अॉक्सीजन किट चे वाटप माजी मुख्यमं...

पत्रकारांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड ची कमतरता पडू देणार नाही. पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील.

Image
  पत्रकारांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड ची कमतरता पडू देणार नाही.  ____पंचायत समिती सदस्य  नामदेव पाटील. कराड - प्रतिनिधी (सारिका मंडले) अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या साठी हॉस्पिटलमध्ये कोव्हीड सेंटर मध्ये कमीत कमी दोन बेड राखीव असावे असे निवेदन पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांना देण्यात आले. या वेळी बोलताना पाटील म्हणाले की सत्यजित पाटील पतसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत खोडशी, वनवासमाची, वारूंजी, मुंडे तसेच कराड शहर पोलीसांना देखील अॉक्सीजन मशीन दिली. तसेच येत्या काही दिवसांत जनता बॅंकेच्या शेजारी 30 बेड च्या कोयना कोव्हीड सेंटर चे काम सुरू होईल त्याचा फायदा सर्व सामान्यांना देखील होईल. ग्रामीण भागातील सर्व सामान्यांना देखील कधीही कुठल्याही प्रकारची मदत लागली तर त्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन त्यांना मदतीचा हात देवू अशाच प्रकारे आमच्या पत्रकार बांधवांना देखील कोव्हीड सेंटर आणि हॉस्पिटल मध्ये मध्ये बेड ची कमतरता पडू देणार नाही व कुठल्याही प्रकारे पत्रकारांसाठी बेड ची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली या व...

ऑलम्पिंकवीर स्व.पै.खाशाबा जाधव यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला पाहिजे

Image
   ऑलम्पिंकवीर  स्व.पै.खाशाबा जाधव यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला पाहिजे .   'मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी यांचा जाहीर पाठिंबा.' शिराळा -  प्रतिनिधी (आनंदा सुतार)     भारत देशाला पहिलं वहिलं आॅलम्पिंक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे जिगरबाज मल्ल स्व.पै.खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार मिळावा यासाठी कुस्ती मल्लविद्या महासंघ व कुस्ती मल्लविद्या महासंघ प्रवक्ते पै.संग्राम कांबळे यांच्या वतीने जन आंदोलन उभारण्यात आले आहे.        स्व.पै.खाशाबा जाधव यांनी १९५२ साली भारत देशाला वैयक्तिक क्रिडा प्रकारात पहिलं पदक मिळवून दिलं. परंतु अशा इतिहासाची नोंद करणा-या जिगरबाज मल्लास शासन दरबारी घोर उपेक्षाच पदरी पडली. कोणतीच मदत अथवा पुरस्कारासाठी त्यांची दखल घेण्यात आली नाही हीच सल मनात धरून कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक पै.गणेश मानुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती मल्लविद्या महासंघ प्रवक्ते पै.संग्राम कांबळे यांनी हे जन आंदोलन उभा केले .        या आंदोलनास मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी यांनी जाहीर...

प्रशिक्षीत स्वयंसेवकांची गरज पूर्ण करण्यासाठी कोरोना कमांडो प्रशिक्षण स्तुत्य उपक्रम. __पालकमंत्री जयंत पाटील.

Image
  प्रशिक्षीत स्वयंसेवकांची गरज पूर्ण करण्यासाठी कोरोना कमांडो प्रशिक्षण स्तुत्य उपक्रम.   __पालकमंत्री जयंत पाटील   शिराळा -  प्रतिनिधी  (आनंदा सुतार)  कोरोना विरूध्दच्या लढ्यासाठी सर्वात आनंदा सुतार गरज स्वयंसेवकांची भासत आहे. कोरोना कमांडो प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षीत स्वयंसेवकाची गरज पूर्ण करण्याचे काम भारतीय जैन संघटना सांगली व वानलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त प्रयत्नातून होत आहे. त्यांचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.  राजमती भवन नेमिनाथनगर येथे भारतीय जैन संघटना सांगली व वानलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोना कमांडो प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, वानलेस हॉस्पिटलचे संचालक डॉ. नथानियल ससे, एनसीसी बटालियनचे कर्नल एस. के. बालू, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्र्रीय कार्यकारणी सदस्य तथा माजी महापौर सुरेश पाटील आदि उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, कोरोना कमांडो प्रशिक्षण घेतलेल...

कोविड मुक्त गाव मोहिम राबविण्यासाठी आराखडा तयार करा. पालकमंत्री जयंत पाटील

Image
  कोविड मुक्त गाव मोहिम राबविण्यासाठी आराखडा तयार करा. पालकमंत्री जयंत पाटील. शिराळा -   प्रतिनिधी (आनंदा सुतार ) कोविड मुक्त गाव मोहिम राबविण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करा, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी आदि उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करावी. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत तपासणीसाठी घरोघरी येणाऱ्या आरोग्य पथकास नागरिकांनी सत्य ती सर्व माहिती द्यावी, कोणतीही माहिती लपवू नये. कोरोनाची काही लक्षणे असल्यास अथवा काही त्रास होत असल्यास तात्काळ तपासणी करून ...

मणदूर येथे मिनी कोविड सेंटर सुरु.

Image
  मणदूर येथे मिनी कोविड सेंटर सुरु. "मणदूर सारख्या छोठ्याशा गावाचा आर्दश तालुक्यातील इतर गांवानी घेणे गरजेचे."___तहसिलदार गणेश शिंदे .   प्रतिनिधी - गणेश माने (वारणावती) माझे कुटंब माझी जबाबदारी ही संकल्पना लक्षात घेवुन मणदूर ग्रामस्थानी माझा गांव माझी जबाबदारी ही संकल्पना राबवाविण्याचा ध्यास घेत मिनी कोविंड सेंटर निर्माण संकल्प पूर्ण केला मणदूर ता शिराळा येथील प्राथमिक आरोग्य केद्रांमध्ये पाच  बेड , चार ऑक्सिजन सिलेंडर  एक ऑक्सिजन मशिन सह कोविड प्राथमिक उपचार केंद्र सरपंच वंसत पाटील व ग्रामस्थ यांच्या  मदतीने लाखो रुपायांचा निधी गोळा करून  मणदूर प्राथमिक केंद्रात  मिनी कोविड सेंटर   निर्माण करण्यात आले याचा लोकार्पण सोहळा तहसिलदार गणेश शिंदे ,गटविकास अधिकार अनिल बागल व कोकरूड पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तहसिलदार गणेश शिंदे म्हणाले मणदूर गावचा आर्दश हा मणदूर कोविड पॅर्टन तालूक्यात प्रत्येक गावंनी राबवावा असे अवहान त्यांनी या वेळी केले सध्या कोविड माहमारीच्या काळात सर्वाना बेड उपलब्द क...

घोगाव येथील नर्सिंग सायन्सेस कॉलेज ला उपाध्यक्षा सारिका मंडले यांची सदिच्छा भेट.

Image
घोगाव येथील नर्सिंग सायन्सेस कॉलेज ला उपाध्यक्षा सारिका मंडले यांची सदिच्छा भेट. कराड - प्रतिनिधि, ( सारिका मंडले) घोगाव ता कराड येथील शिवराष्ट्र नर्सिंग सायन्सेस कॉलेज ला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी सदिच्छा भेट घेतली या वेळी बोलताना मंडले म्हणाल्या कॉलेज च्या माध्यमातून मुलींना चांगल्या प्रकारे शिक्षणाची सोय संस्थेचे अध्यक्ष संजय भावके यांनी ग्रामीण भागातील मुलींसाठी केली हे त्यांचे कार्य आदर्शवत आहे या वेळी गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल च्या प्राचार्य प्राजक्ता सोळंकुरे, शाखा अभियंता लक्ष्मण मंडले, पश्चिम महाराष्ट्र चे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे उपस्थित होते.  

पोलीस उपनिरीक्षक राजीव डांगे यांनी केला महिला मंच च्या उपाध्यक्षा सारिका मंडले यांचा सन्मान.

Image
  पोलीस उपनिरीक्षक राजीव डांगे यांनी केला महिला मंच च्या उपाध्यक्षा सारिका मंडले यांचा सन्मान. कराड - प्रतिनिधि,  कराड येथील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र च्या उपाध्यक्ष पदी सारिका मंडले यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली या बद्द्ल त्यांचे कराड चे पोलीस उपनिरीक्षक राजीव डांगे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सन्मान केला या वेळी बोलताना डांगे म्हणाले पोलीस खात्याच्या वतीने नेहमीच सहकार्य केले जाईल या वेळी पुढारी चे पत्रकार आनंदा शेवाळे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चे पश्चिम महाराष्ट्र चे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे उपस्थित होते.

साळशिरंबे गावामध्ये स्व.पंडितजी दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी.

Image
  साळशिरंबे गावामध्ये  स्व.पंडितजी दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी. साळशिरंबे - प्रतिनिधि, भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण मंडलातील पंचायत समिती गणा मधील साळशिरंबे गावामध्ये आज दि.25 सप्टेंबर रोजी जनसंघाचे संंस्थापक स्व.पंडितजी दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भाजपा युवा मोर्चा कराड दक्षिण मंडल अध्यक्ष मा.पंकज पाटील, पैलवान मा.प्रकाश पाटील, पैलवान मा.अमोल पाटील, मा.दादासो शेवाळे, मा.सचिन साळुंखे, मा.तानाजी पवार उपस्थित होते.

कडधान्य उत्पादक वा-यावर. सोया खरेदी व्यापारी बेभान. नागरी पुरवठा विभागाच्या कारवाईची प्रतिक्षा.

Image
  कडधान्य उत्पादक  शेतकरी वा-यावर. "सोया खरेदी व्यापारी बेभान." '  नागरी पुरवठा विभागाच्या कारवाईची प्रतिक्षा.' उंडाळे - प्रतिनिधी ( प्रदिप पाटील)     सध्या खरीप हंगामातील पिके व कडधान्यांची काढणी सुरु झाली आहे . जगात थैमान घातलेल्या कोरोनामुळे शेतकरी वर्ग अगोदरच मेटाकुटीला आल्याने , कामगार मिळत नसुन , निसर्गाच्या बेभरवशामुळे थोडेफार प्रमाणात मिळण्या-या उत्पनावर सध्या शेतकरी वर्गास गुजराण करावी लागणार आहे. त्यातच शेतीतुन निघणाऱ्या सोयाबीन, भुईमूग व इतर कडधान्यांच्या माध्यमातून आपला विस्कटलेला संसार संभाळण्यांच्या तयारीत असताना जगाचा पोंशिदा दिसत आहे, मात्र रक्ताचे पाणी करुन वाढवलेल्या शेत मालास योग्य भाव , काटामारी याच्यापासुन कसे वाचवावे हाच प्रश्न सध्या शेतकरी वर्गात दिसुन येत आहे.   थोडे फार पैसे मिळावेत, यासाठी शेतकरी झटत असुन आधीच पाऊसांच्या मनमानी पणामुळे तर गत सहा महिन्यापासुन कोरोनाच्या थैमानामुळे हैराण, वेळेवर पिकाना न मिळालेल्या लागवडीने  यंदाच्या उत्पनामध्ये मोठी घट झाली आहे . त्यातच.. ओंड,उंडाळे परिसरातील कडधान्य व्यापा-यांची मनमानी करतांना...

आशा किरण महिला वसतीगृहाचे काम प्रेरणादायी.

Image
  आशा किरण महिला वसतीगृहाचे काम प्रेरणादायी. कराड - प्रतिनिधि,  कराड येथील शासकीय आशा किरण महिला वसतीगृहाचे काम आदर्शवत असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी केले.  त्या महिला वसतीगृहाला दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी बोलत होत्या यावेळी या संस्थेच्या वतीने उपाध्यक्षा सारिका मंडले यांचा सन्मान करण्यात आला या वेळी अधिक्षका सुजाता शिंदे, सिनिअर क्लार्क भावना धनवडे कनिष्ठ काळजी वाहु जयश्री कदम उपस्थित होत्या यावेळी बोलताना उपाध्यक्षा म्हणाल्या की या संस्थेच्या माध्यमातून निराधार महिलांना मोठा आधार मिळतो त्यांना या संस्थेत स्वतः च्या कुटुंबीयप्रमाणे जपले जाते खरचं या संस्थेचा आदर्श इतरांनाही घेण्या सारखा आहे. कराड : महिला वसतीगृहाला दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी   महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले,  अधिक्षका सुजाता शिंदे, सिनिअर क्लार्क भावना धनवडे ,कनिष्ठ काळजी वाहु जयश्री कदम ,उपस्थित होत्या.

चांदोली धरण पुर्ण क्षमतेने भरले.

Image
  चांदोली धरण पुर्ण क्षमतेने भरले. शिराळा - प्रतिनिधी,  चांदोली धरण १०० टक्के भरले असून धरणाच्या पाण्याची पातळी ६२६.९० मीटर असून धरणात ३४.४० टी. एम.सी.पाणीसाठा झाला आहे.  चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टी. एम.सी.आहे. सध्या धरण परिसरात २४ तासात १० मी.मी.पाऊस झाला असून एकूण २५१५ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.विद्युत निर्मितमधून १२८३  क्यूसेक्सने विसर्ग वारणा नदीत सोडला जात आहे.

हणमंतराव पाटील यांना आत्मशक्ती पतसंस्था शाखा शेडगेवाडी येथील कर्मचारी व व्यापारी यांनी वाहीली श्रद्धांजली.

Image
  हणमंतराव पाटील यांना आत्मशक्ती पतसंस्था शाखा शेडगेवाडी येथील कर्मचारी व व्यापारी यांनी वाहीली श्रद्धांजली.    शिराळा -  प्रतिनिधी (आनंदा सुतार) हणमंतराव पाटील (बुवा)पेठ ता.वाळवा यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले त्यांनी वया च्या ७० व्या वर्षी  अखेरचा श्वास घेतला.  त्यांना कराड येथे  खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे. आत्मशक्ती उद्योग समुहाचे ते संस्थापक होते. पेठ व परीसरातील शंभर हुन अधिक लोकांचे ते पालक होते.आत्मशक्ती पतसंस्था शाखा शेडगेवाडी येथील कर्मचारी व व्यापारी यांनी  शाखा कार्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहीली. राजकीय  व सहकार क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ व्यक्तीमत्व असुन त्यांच्या अचानक जाण्याने सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत  शेडगेवाडी शाखा कर्मचारी बाळकृष्ण काबंळे यांनी बुवानां  श्रद्धांजली वाहिली . ते पेठ गावच्या दोन पिढ्यांच्या दरम्यान मार्गदर्शक दुवा होते, हा दुवा निखळला आहे.  ते हसतमुख होते ...

विश्वास..मिळवा कोरोनाशी लढण्याचा .!! भयमुक्त कोरोना मुक्तीसाठी मानसिक आरोग्य हेल्पलाईन. जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी.

Image
  विश्वास..मिळवा कोरोनाशी लढण्याचा .!! भयमुक्त कोरोना मुक्तीसाठी मानसिक आरोग्य हेल्पलाईन. जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी. "जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम… तज्ज्ञ संस्था म्हणून शुश्रुषा संस्थेची नियुक्ती."     शिराळा -  प्रतिनिधी (आनंदा सुतार) कोरोना आपत्तीमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, आजाराविषयीची वाढती भीती, समज गैरसमज, अकस्मात आजारपणामुळे निर्माण झालेला आर्थिक ताण, बेरोजगारी यामुळे लोकामध्ये मानसिक आजारपण वाढत आहे. वाढती व्यसनाधीनता, गुन्हेगारी, आत्महत्या, युवकांमधील नैराश्य यावर लोकांना शास्त्रीय मदत मिळावी, या हेतूने  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने  विश्वास मिळवा कोरोनाशी लढण्याचा ..!हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे व मानसशास्त्रीय हेल्पलाईन सुरु केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी दिली.   उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ.चौधरी  म्हणाले, या उपक्रमामध्ये लोकांचे भावनिक व मानसिक प्रश्न कमी होतील. आजारपणामुळे खचलेल्या कुटुंबांना तज्ञ व्यक्तीकडून भावनिक आधार मिळेल. तज्ज्ञ संस्था म्हणून इस्लामपूर येथील...

कोरोनाच्या उच्चाटनासाठी सामाजिक संस्थानी योगदान द्यावे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी.

Image
  कोरोनाच्या उच्चाटनासाठी सामाजिक संस्थानी योगदान द्यावे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी     शिराळा -प्रतिनिधी  (आनंदा सुतार) कोरोनावर मात करण्यासाठी शासनामार्फत अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. लोकांच्यामधील समज, गैरसमज दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांच्या माध्यमातूनही प्रबोधन होणे खूप महत्वाचे आहे. सामाजिक संस्थांनी आपआपल्या क्षमतेनुसार याकामी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. राजमती भवन, नेमिनाथनगर येथे भारतीय जैन संघटना आयोजित 'मिशन - कोविड कनेक्ट' या उपक्रमाच्या शुभारंभा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथ्था, संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा माजी महापौर सुरेश पाटील, डॉ. बी.डी. बांडे, दीपक पाटील आदि उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, स्वयंसेवी संस्थानी क्षमतेनसार व उपलब्ध असलेल्या संसाधनानुसार किमान कोविड केअर सेंटर तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, त्याचबरोबर मनुष्य...

पश्चिम महाराष्ट्र च्या उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी घेतली महिला आणि बालविकास अधिकारी यांची भेट.

Image
  पश्चिम महाराष्ट्र च्या उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी घेतली महिला आणि बालविकास अधिकारी यांची भेट. कराड - प्रतिनिधी ,  अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी सातारा येथील महिला आणि बालविकास अधिकारी यांची भेट घेऊन या कार्यालयाच्या माध्यमातून  महिलांना साठी या संरक्षण व कायदे विषयक माहिती घेतली या मध्ये महिलांना वर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आपण सामाजिक महिला मंच च्या माध्यमातून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे मत व्यक्त केले या वेळी त्यांना महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी आश्वासन दिले कि आपणास महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने मार्गदर्शन केले जाईल या वेळी परिवेक्षा अधिकारी तुषार सुरत्रान, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता देशमुख यांनी महिला आणि बालकल्याण विभागाच्या माहिती चे पुस्तक उपाध्यक्षा सारिका मंडले यांना भेटी प्रसंगी दिले यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शुभम शेवाळे उपस्थित होते.   सातारा:बालकल्याण विभागाच्या माहिती चे पुस्तक उपाध्यक्षा सारिक...

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि संघ संचलित सामाजिक महिला मंच यांचे चर्चासत्र संपन्न .

Image
  अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि संघ संचलित सामाजिक महिला मंच यांचे चर्चासत्र संपन्न . कराड - प्रतिनिधि,  अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि संघ संचलित सामाजिक महिला मंच च्या या माध्यमातून शासकीय विश्रामगृहात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते या मध्ये या नवनिर्वाचित पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सामाजिक महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले, सुवर्णा शेवाळे उपस्थित होत्या

कोकरूड वसाहत येथे सापडले दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले " एॅटलास माॅथ "

Image
  कोकरूड वसाहत येथे सापडले दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले " ऍटलास माॅथ"  शिराळा -  प्रतिनिधी  (आनंदा सुतार)          जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "ऍटलास  माॅथ" शिराळा तालुक्यातील जलसंपदा वसाहत कोकरूड येथे सापडले.येथील वारणा डावा तीर कालवा उपविभाग क्रमांक १ कार्यालयाच्या समोरील तुळशीच्या झाडावर हे पतंग (फुलपाखरू)  काही काळ विसावले होते.         कोकरुड कार्यालयाचे सहाय्य अभियंता  श्री.ए.आर.लांडगे  व एस.ए. मुजावर कनिष्ठ अभियंता व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी कुतूहलाने त्याचे फोटोही काढले.मात्र  याच वसाहतीत वास्तव्यास असणारी कु. मिनाजुल सरदार मुजावर हिने गुगल वर या प्रजातीबद्दल माहिती शोधली असता ते  दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "एॅटलास माॅथ" आहे हे समजले.            जगातील सर्वात मोठ्या पतंगांमध्ये "एॅटलस माॅथ" गणती होते. त्याचा रंग आकर्षक बदामी-तपकिरी व किंचित लालसर असतो. त्याच्या पंखांवर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके ...

उंडाळ्यात ऑक्सीजन बेडसह सुसज्ज असे कोरोना उपचार केंद्र सुरू करा , अन्यथा तीव्र आंदोलन करू.

Image
  उंडाळ्यात ऑक्सीजन बेडसह सुसज्ज असे कोरोना उपचार केंद्र सुरू करा .  " अन्यथा तीव्र आंदोलन करू.- उंडाळे  येथील ग्रामस्थांची मागणी." ' सामान्य नागरिकांच्यात कमालीचा असंतोष उद्रेक होण्याची दाट शक्यता.'  उंडाळे - प्रतिनिधी (प्रदीप पाटील ) कोरोना चा वाढता विळखा लक्षात घेत व   कोविड बाधित रुग्णांना ऑक्सीजन बेड उपलब्ध होत नसल्याने  लोकांची परिस्थिती गंभीर होऊन काही लोकांचे मृत्यू होत आहे .तसेच खासगी रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च येत आहे .हा खर्च गोरगरीब लोकांना परवडत नाही ते कर्जबाजरी होता आहे .याचा विचार करून उंडाळे येथे 50 ऑक्सीजन बेडचे सुसज्ज असे कोविड केंद्र उभे करावे या मागणीचे निवेदन उंडाळे येथील सजग ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले .हातावर हात ठेवून उगाच इतर गोष्टीत प्रशासनाने वेळ न घालवता तात्काळ उंडाळ्यात या सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी या निवेदनात केली आहे .निवेदनावर गावातील 150 नागरिकांच्या सह्या आहेत. तरी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल न घेतल्यास आम्हाला आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेल .

लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना स्थळावरील कोवीड केअर सेंटरचे लोकार्पण .

Image
   लोकनेते बाळासाहेब देसाई  कारखाना स्थळावरील कोवीड केअर सेंटरचे लोकार्पण . "50 ऑक्सिजन बेड- 25 नॉन ऑक्सिजन बेड- एकूण 75 बेडची सुविधा ." कराड दि.20 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे.कराड, सातारा याठिकाणी ऑक्सिजन बेडची कमतरता जाणवू लागली आहे.ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे कोरोना बाधित व्यक्तींच्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे.अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्यातून कोवीड केअर सेंटर उभे करुन पाटण विधानसभा मतदारसंघातील कोरोना बाधितांना उपचार देणेकरीता आम्ही पुढाकार घेतला केवळ पाच ते सहा दिवसात हे कोरोना कोवीड सेंटर उभे करण्याचे काम केले असून येथे 50 ऑक्सिजन बेड,25 नॉन ऑक्सिजन बेड अशी एकूण 75 बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.आवश्यक असणारे 18 वैद्यकीय अधिकारी,17 कर्मचारी, औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. आजपासूनच हे सेंटर कोरोना रुग्णांना उपचाराकरीता खुले करण्यात आले आहे असे प्रतिपाद...

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा, पालकमंत्री जयंत पाटील.

Image
  माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा,  पालकमंत्री जयंत पाटील.   सांगली - प्रतिनिधी  (आनंदा सुतार) कोरोना बाधित रूग्ण लवकर उपचाराखाली येण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा. या मोहिमेबाबत लोकांच्यामध्ये जनजागृती करा. यासाठी ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, प्रतिष्ठित व्यक्तींची मदत घेऊन लोकांमध्ये जागरूकता करावी. कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंंगाने काय करावे, काय करू नये याबाबतच्या सूचनांच्या पत्रकाचे वाटप करावे व सर्व्हे चांगला करून घ्यावा, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळु...

उंडाळे विभागात अवैध गौण उत्खनन फार्मात. जिल्हा पातळीवर कायदेशीर , कारवाई ची मागणी

Image
  उंडाळे विभागात अवैध गौण उत्खनन फार्मात. " जिल्हा पातळीवरून कायदेशीर कारवाईची नागरीकांच्यातून मागणी".  उंडाळे-  प्रतिनिधी ( प्रदिप पाटील)   उंडाळे भागातील असणाऱ्या साळशिरंबे, तुळसण, विठ्ठलवाडी, टाळगाव ,तसेच ओंड या भागातील असणाऱ्या डोंगर रांगांमध्ये गौण खनिजाचे उत्खननचे प्रमाण वाढलेले दिसून येत असुन या  सर्व ठिकाणी जेसीबी व पोकलेन यासारख्या आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून ठीक ठिकाणी मुरूम उत्खननाचे प्रमाण वाढलेले आहे. डोंगराळ भागात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक जोमात सुरू आहे.  महसूल खात्याची परवानगी, सरकारची रॉयल्टी भरली असेल तर ती ही नाममात्र दिसुन येते मात्र, हजारो ब्रास मुरूम उत्खनन व वाहतूक झाली आहे.    प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गौण खनिज माफियांनी डोंगर सपाट करण्याचा सपाटा लावला आहे. जेसीबी मशीनद्वारे मुरुम भरुन, पाच- सहा डंपर दिवस- रात्र खेपा करीत आहेत. भरधाव वेगाने जाणारे पाच ब्रासपेक्षा जास्त क्षमतेचे अवाढव्य डंपर प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवित आहेत.    गौण खनिज पर्यावरणाच्या दृष्टीने गरजेचे आहे परंतु उंडाळे भागातील असणाऱ्या त...

सामाजिक महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र च्या उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी केली पश्चिम महाराष्ट्र च्या विभागीय संघटक पदी लेखिका संगीता येळवे यांची नियुक्ती.

Image
  सामाजिक महिला मंचच्या पश्चिम महाराष्ट्र  विभागीय  संघटक पदी लेखिका संगीता येळवे . "पश्चिम महाराष्ट्र च्या उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी केली नियुक्ती." कराड - प्रतिनिधी, कराड येथील शासकीय विश्रामगृहात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित सामाजिक महिला मंच च्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस अध्यक्ष स्थानी सामाजिक महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले या होत्या यावेळी अॅड विठ्ठलराव येळवे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे नवभारत संस्थेचे संचालक, येळवेवाडी येथील माजी ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते यावेळी  अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित सामाजिक महिला मंच च्या पश्चिम विभागीय संघटक पदी संगीता येळवे यांची नियुक्ती पश्चिम महाराष्ट्र च्या उपाध्यक्षा सारिका मंडले यांनी केली सदर ची नियुक्ती केंद्रीय कार्यकारिणी च्या आदेशानुसार करण्यात आली यावेळी बोलताना मंडले म्हणाल्या सामाजिक महिला मंच च्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना सक्षम करण्याचे कार्य करणार आणि संघटनेने जी जबाबद...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी कराड दक्षिण भाजपच्यावतीने राबवण्यात आले विविध सामाजिक उपक्रम.

Image
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी कराड दक्षिण भाजपच्यावतीने राबवण्यात आले विविध सामाजिक उपक्रम.   कराड - प्रतिनिधी (प्रदीप पाटील  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये दि.१४ ते २५ सप्टेबर या कालावधीमध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  भाजपा तालुकाध्यक्ष पै.धनंजय पाटील, मलकापुर युवा मोर्चा शहर अध्यक्ष तानाजी देशमुख, धनाजी माने खुबीकर, किसान मोर्चा उपजिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, गोंदीचे उपसरपंच किशोर पवार, डि.एस.सोमदे, सुनिल शिंगाडे, यांच्यासह सरपंच ,उपसरपच,ग्रा.पं.सदस्य व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशामध्ये सेवा सप्ताहदिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. यावेळी सर्वञ सामाजिक उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्रप्रदेश कार्यकारिणी सदस्य डाॅ.अतुलबाबा भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली  तालुक्यातील शेरे संजयनगर, गोंदी गावठाण, जुळेवाडी, मलकापुर, काले, रेठरे बुद्रुक,येणके,कोळे, येथे सार्वजनिक स्वच्छता अभियान, फळे वाटप, वृक्षारोपण,जेष्ठ ...

सारिका मंडले यांचा सन्मान.महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती.

Image
  सारिका मंडले यांचा सन्मान. "महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती." कराड - प्रतिनिधी ( ज्ञानेश्वर शेवाळे ) कराड तालुक्यातील मनव येथील सारिका मंडले यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या बद्द्ल त्यांचे लोकमत चे संपादक संजय पाटील, स्नेहा तोडकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सारिका मंडले यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

शिराळा उप जिल्हा रुग्णालयात सहा हजार लिटर क्षमतेच्या ऑक्सीजन युनिटची उभारणी

Image
    शिराळा उप जिल्हा रुग्णालयात  सहा हजार लिटर क्षमतेच्या ऑक्सीजन युनिटची उभारणी. शिराळा - प्रतिनिधी (आनंदा सुतार) शिराळा उप जिल्हा रुग्णालयात ६ हजार लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन युनिटची उभारणी सुरू झाली असून येत्या आठ दिवसात हे युनिट कार्यान्वीत होईल, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. चार व्हेटींलेटर, दोन ड्यूरा ऑक्सिजन सिलींडर, रेमडिसिविर सारखी महागडी इंजेक्शनही उपलब्ध झाली आहेत, असे ते म्हणाले. आज आमदार नाईक यांनी उप जिल्हा रुग्णालयात भेट देवून येथील सोई, सुविधांची पहाणी केली. सोबत तहसीलदार गणेश शिंदे होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्याबाबत दोन दिवसापूर्वी बैठक झाली. या बैठकीत कठोर शब्दात कांही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अंमलबजावणी होत आहे का, हे पाहण्यासाठी आज उप जिल्हा रुग्णालयास भेट दिली. सध्या येथे ७५ बेड उपलब्ध असून त्यांना ऑक्सीजनची जोडणी आहे. याशिवाय चार व्हेंटीलेटर संच उपलब्ध झाले आसून ते बसवणे व त्यास आवश्यक डॉक्टर व परिचारीका उपलब्ध झाल्या आहेत.  आमदार नाईक म्हणाले, कोरोना विषाणुवर नियंत्...

महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी डॅशिंग लेडी सारिका मंडले यांची वर्णी.

Image
    महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी डॅशिंग लेडी सारिका मंडले यांची वर्णी. उंडाळे - प्रतिनिधी (प्रदीप पाटील ). मनव ता कराड येथील सारिका मंडले यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या बद्द्ल त्यांचे एस के कंपनी च्या वतीने चेअरमन प्रतिक शहा व्हा चेअरमन अजिंक्य खरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला या वेळी बोलताना मंडले म्हणाल्या महिलांना प्रशासकीय योजनांची माहिती मिळावी व त्यांनी स्वतःच्या कुटुंबा बरोबर इतर महिलांच्या कुटुंबीयांचा देखील विचार करावा यासाठी माझे प्रयत्न राहतील आणि संघटना वाढी लवकरच प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकारिणी गठीत करण्यात येईल व योग्य व्यक्तींची निवड करून त्यांचा सन्मान करण्यात येईल. या वेळी एस के कंपनी चे पदाधिकारी कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.   

मायक्रोफायनान्स व वाहनांचे कर्ज हप्ते डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात यावे..

Image
  मायक्रोफायनान्स व वाहनांचे कर्ज हप्ते डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात यावे . जनता क्रांती दल सातारा जिल्हा यांची मागणी . कराड - प्रतिनिधी ( सारीका मंडले) कोरोनासारख्या विषाणू संसर्गामुळे लोकांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. लोकांच्या हाताला कामधंदा  नसल्यामुळे  आणि लॉकडाउन सारखी परिस्थिती  चालूच असल्यामुळे नागरिकांवर आर्थिक संकट आले आहे.तरी मायक्रो फायनान्स, ट्रॅव्हलर , फोरव्हिलर वाहन फायनान्स कंपनी चे कर्मचारी लोकांना हप्ते भरण्याचा तगादा लावला आहेत . कराड तालुका येथील मायक्रो फायनान्स कंपनी कडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते  डिसेंबर महिन्या पर्यंत थांबवण्यात यावे यासाठी आज जनता  क्रांती दल संघटना  सातारा जिल्हा यांनी  प्रांतअधिकारी, तहसिलदार   कार्यालय कराड यांना  व  जिल्हा अधिकारी कार्यालय सातारा यांना  निवेदन  दिले.   यावेळी मा. अनिल लोंढे  (सातारा जिल्हा अध्यक्ष ) जनता क्रांती दल संघटना  , श्री. सागर लाखे  ( कराड  शहर अध्यक्ष जनता क्रांती दल),  श्री. विक्रम साठे  (युवक अध्यक्ष क...

महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सौ सारिका मंडले यांची निवड.

Image
  महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सौ सारिका मंडले यांची निवड. कराड - प्रतिनिधी , अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सौ सारिका लक्ष्मण मंडले यांची नियुक्ती करण्यात आली. सदर ची नियुक्ती केंद्रीय कार्यकारिणी च्या माध्यमातून करण्यात आली या निवडी बद्दल त्यांचे लेखिका व कवयत्री संगीता येळवे व अॅड विठ्ठलराव येळवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळी बोलताना मंडले म्हणाल्या महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण करणे महिलांनी चूल आणि मूल या गोष्टी बाजूला ठेवून स्वतः बरोबर इतर महिलांचा देखील विकास करावा यासाठी माझे प्रयत्न राहतील आणि संघटना वाढी साठी चांगल्या व्यक्तींची निवड करून महिलांना सक्षम करण्याचे कार्य करणार आहे या निवडी बद्दल केंद्रीय अध्यक्ष मनोहरजी सुने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापु देशमुख केंद्रीय सचिव सुरेश सवळे महिला मंच च्या प्रदेशाध्यक्ष जयश्रीताई पडागडे सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते , शाखा अभियंता लक्ष्मण मंडले, पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे आदी अभिनंदन केले.

शिराळा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन न मिळाल्याने रुग्ण लागले तडफडू.शिराळा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन न मिळाल्याने रुग्ण लागले तडफडू.

Image
  शिराळा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन न मिळाल्याने रुग्ण लागले तडफडू. शिराळा - प्रतिनिधी (आनंदा सुतार)   शिराळा उप जिल्हा रुग्णालयात रूग्णांची हेळसांड होत असून  दवाखान्यात अॅडमीट तीन वृद्ध कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सीजन कमी आहे हे कारण सांगुन सांगलीत ऑक्सीजन बेड आहे जावा म्हणून हाकलून देण्यात आले.  सांगली येथे अ‍ॅडमिट करून घेतले जाणार आहे का बेड मिळणार आहे का याची खात्री न करताच रूग्ण रात्री बारा वाजता नातेवाईकांना बोलावून पाठवण्यात आले.  तीन वयोवृद्ध कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांना व नातेवाईकांना १०८ रुग्णवाहीकेतुन एकत्रच पाठवले . कोरोना बाधित रूग्णांच्या गाडीत नातेवाईकांना बसवण्याचा अजब प्रकार घडला आहे. डॉक्टर पी पी कीट व नातेवाईक साध्या वेषात गाडीत होते.  सांगली येथे रात्री बारा वाजता पाठवले सदर तीन वृद्ध रूग्णांना सांगलीत अ‍ॅडमिट न करता परत शिराळा येथे पाठवले चार दवाखाने फिरूनही त्यांना रात्री कोणीच घेतले नाही. रात्रभर फिरून परत त्यांना शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.शिराळा उपजिल्हा रूग्णालयात ऑक्सीजन किती आहे रुग्णालयातील कर्मचारी यांना माहिती...

नवीन पूलाचे काम सुरू असताना पोकलॅन मशिन नदीपात्रात कोसळले.

Image
  नवीन पूलाचे काम सुरू असताना  पोकलॅन मशिन नदीपात्रात कोसळले.      शिराळा - प्रतिनिधी  (आनंदा सुतार )        सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या काखे मांगले या नवीन पुलाच्या कामास सुरुवात केली आहे  त्यामुळे जुना पुल पाडण्याचे काम सुरु असताना पोकलॅन मशिन वारणा नदी  पात्रात कोसळले. यामध्ये सुदैवाने  कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.     मांगले काखे  नवीन पुलाच्या  कामासाठी   बारा कोटी रुपये मंजुर आहेत या  पुलाच्या कामास सुरुवात झाली असुन दरम्यान नविन पुलाच्या पिलर उभारणीसाठी जुन्या पुलाचा काही भाग पोकलॅन मशिनने तोडण्यात येत होता. यावेळी अचानक पुलाचा स्लॅबचा गाळा पोकलॅन मशिन सह वारणा नदी पात्रात कोसळला. दरम्यान पोकलॅन ऑपरेटर या दुर्घटनेतुन सुखरूप पणे बाहेर पडला. दरम्यान कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.  घटनास्थळी नागरिकांनी  मोठी गर्दी केली होती.

जेष्ठ नागरिक निवृत्ती पांडुरंग पवार यांचे निधन.

Image
  जेष्ठ नागरिक निवृत्ती पांडुरंग पवार यांचे निधन. कराड - प्रतिनिधी  (ज्ञानेश्वर शेवाळे ) बेलवडे हवेली येथील जेष्ठ नागरिक निवृत्ती पांडुरंग पवार यांचे निधन. बेलवडे हवेली ता कराड येथील निवृत्ती पांडुरंग पवार यांचे  14/09/2020 रोजी .दुःखद निधन झाले पुणे येथील माजी नगरसेवीका व भाजपच्या जिल्हा सचिव व नरेंद्र मोदी विचार मंचच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा शालिनीताई गुणवंत यांचे व्याही होते तर प्रतिभाताई गुणवंत यांचे वडील होते.

शिराळा तालुक्यात जनता कर्फ्यूचा बोऱ्या .

Image
    शिराळा तालुक्यात जनता कर्फ्यूचा बोऱ्या . "काही गावे वगळता सर्वत्र बाजारपेठा व रस्त्यांवर नियमित गर्दी " शिराळा - प्रतिनिधी  ( आनंदा सुतार ) शिराळा तालुक्यात  शुक्रवारपासून सुरू झालेल्या जनता कर्फ्यूचा बोऱ्या वाजल्याचे चित्र आहे. काही गावे वगळता सर्वत्र बाजारपेठा व रस्त्यांवर नियमित गर्दी दिसत आहे.कोणतेही काम नसताना नागरिकांची रस्त्यावर   रेलचेल सुरूच आहे. एकूणच प्रशासन लोकप्रतिनिधी, व्यापाऱ्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे जनता कर्फ्यूचा  फ्लॉप शो झाला आहे.     शेडगेवाडी बाजार पेठेतही काहीसा असाच प्रकार या जनता कर्फ्यू मध्ये दिसुन येत आहे ग्रामपंचायतीने ११सप्टेबर पासुन पुढील दहा दिवस बंद चेआवाहन करुन दंड आकारण्याची घोषणा केली होती मात्र ती तोंडीचअसल्याची चर्चा सुरु आहे.व्यापारी वर्गातुन बंदला अल्प प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा फक्त पाच दिवस बंद सांगण्यात आले तरीही  बाजार पेठेत साखळी तोडण्यासाठी केलेल्या उपाय योजनांचा फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. स्थानिक व्यापारी  दुकानच्या बाहेर बसुन ग्राहकांना मालाची विक्री करत आहेत पंरतु ...

कोडोली येथे रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्येकडून युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक

Image
कोडोली येथे रोशनबी शमनजी  कृषी महाविद्यालयाच्या कृषी  कन्येकडून  युरिया प्रक्रियेचे  प्रात्यक्षिक. कार्वे प्रतिनिधी :-                      कोडोली ता. कराड येथे रोशनबी कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या सोनाली कृष्णा जगताप हिने ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.  कृषिकन्या सोनाली जगताप हिने चाऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने युरियाचा वापर करून चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया करताना कोणकोणत्या साहित्याचा वापर करावा व किती प्रमाणात करावा यांच्या माहितीसह संपूर्ण प्रात्यक्षिक करून दाखविले, तसेच गुळ, खनिजे यांचे प्रमाण किती असावे याबाबत ची उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना या कृषि कन्येने दिली.          यावेळी कृषिकन्या चे वडील कृष्णा विष्णू जगताप, बाळासो कदम,  दत्तात्रय जगताप, भरत जगताप, डॉक्टर शशिकांत जगताप तसेच कोडोली गावातील शेतकरी उपस्थित होते. हे प्रत्यक्ष घेण्यासाठी कृषिकन्या सोनाली कृष्णा जगताप हिला तिच्या वडिलांचे कृष्णा विष...

संगणक परिचालकांचे मानधना विना हाल माऊस ऐवजी हाती विळा दोरी!!!

Image
  संगणक परिचालकांचे मानधना विना हाल माऊस ऐवजी हाती विळा दोरी!!  " संपास महिना होऊनही चर्चा नाहीत १० ऑगस्टपासून ग्रामपंचायती मधील संगणक काम ठप्प".   शिराळा -  प्रतिनिधी  (आनंदा सुतार) कोरोना काळात ही संगणक परिचालक बाहेरून येणाऱ्या लोकांच्या नोंदी ठेवणे तसेच विविध कोरोना रिपोर्ट, चेक पोस्ट ड्युटी हे काम करत आहेत परंतु कंपनीच्या मनमानी कारभारामुळे दहा वर्षात त्यांना कधीच वेळेवर मानधन भेटले नाही संगणक परिचालक कितीही काम करण्यास तयार आहेत पण वेळेत मानधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गेल्या १० ऑगस्टपासून सांगली जिल्हा सर्व संगणक परिचालक बेमुदत संपावर गेले आहेत .गेली दहा वर्ष ग्रामपंचायत स्तरावर विविध दाखले उतारे विविध रिपोर्टिंगचे काम संगणक परिचालक करताहेत जिल्ह्यामध्ये सध्या ५७० ग्रामपंचायतीमध्ये ५२८ संगणक परिचालक कार्यरत आहेत त्यांचे मानधन हे शासनाच्या १४ वा वित्त व १५ वा वित्त आयोग या निधी मधून होते ही रक्कम शासनाकडून ग्रामपंचायतीला व ग्रामपंचायतीकडून ही रक्कम जिल्हा परिषद ला वर्ग केली जाते .त्यानंतर ती कंपनी ला जाते मागील पाच महिन्याची २ को...