वाकुर्डे योजनेसाठी ज्या शेतकऱ्याच्या जमिनी संपादित झाल्या आहेत त्यांना जमिनीचा शासकीय दरापेक्षा २५ टक्के जादा मोबदला मिळवून देणार.

 वाकुर्डे योजनेसाठी ज्या शेतकऱ्याच्या जमिनी संपादित झाल्या आहेत त्यांना जमिनीचा शासकीय दरापेक्षा २५ टक्के जादा मोबदला मिळवून देणार.


शिराळा  - प्रतिनिधी( आनंदा सुतार)

वाकुर्डे योजनेसाठी ज्या शेतकऱ्याच्या जमिनी संपादित झाल्या आहेत त्यांना जमिनीचा शासकीय दरापेक्षा २५ टक्के जादा मोबदला मिळवून देणार, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

 येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रांताधिकारी नागेश पाटील प्रमुख उपस्थित होते. 

आमदार नाईक म्हणाले, वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी ५९७ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी सुमारे १६ कोटी रुपये आले आहेत. शासकीय दराने मिळणारा मोबदला रक्कमेपेक्षा शेतकऱ्यांनी खाजगी वाटाघाटी केल्यास या रक्कमेपेक्षा २५ टक्के रक्कम जादा मिळू शकते. हा शेतकऱ्यांचा फायदा करून देण्यासाठी शेतकऱ्यांशी गावावर संवाद साधणार आहे. यावेळी महसूल व वारणा कालवे विभागाचे अधिकारी सोबत असतील. तसेच या वेळी कालव्या संदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी असल्यास त्याही दूर केल्या जातील. शिराळा डोंगराळ आहे. विशेषतः तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकरी अल्प भू धारक आहे. त्यांना त्यांच्या गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा हाच यामागचा हेतू आहे. शिवाय वाकुर्डे योजनेचे पाणी येऊन हा विभाग बारमाही ओलिताखाली येणार आहे. 

प्रारंभी तहसीलदार गणेश शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन आमदार नाईक व प्रांताधिकार्यांनी केले. यावेळी वारणा कालवेचे कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे यांच्यासह वाकुर्डे योजनेशी संबंधित अधिकारी व काही गावातील शेतकरी उपस्थित होते. 



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .