संगणक परिचालकांचे मानधना विना हाल माऊस ऐवजी हाती विळा दोरी!!!

 संगणक परिचालकांचे मानधना विना हाल माऊस ऐवजी हाती विळा दोरी!!

 "संपास महिना होऊनही चर्चा नाहीत १० ऑगस्टपासून ग्रामपंचायती मधील संगणक काम ठप्प".



  शिराळा -  प्रतिनिधी  (आनंदा सुतार)

कोरोना काळात ही संगणक परिचालक बाहेरून येणाऱ्या लोकांच्या नोंदी ठेवणे तसेच विविध कोरोना रिपोर्ट, चेक पोस्ट ड्युटी हे काम करत आहेत परंतु कंपनीच्या मनमानी कारभारामुळे दहा वर्षात त्यांना कधीच वेळेवर मानधन भेटले नाही संगणक परिचालक कितीही काम करण्यास तयार आहेत पण वेळेत मानधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गेल्या १० ऑगस्टपासून सांगली जिल्हा सर्व संगणक परिचालक बेमुदत संपावर गेले आहेत .गेली दहा वर्ष ग्रामपंचायत स्तरावर विविध दाखले उतारे विविध रिपोर्टिंगचे काम संगणक परिचालक करताहेत जिल्ह्यामध्ये सध्या ५७० ग्रामपंचायतीमध्ये ५२८ संगणक परिचालक कार्यरत आहेत त्यांचे मानधन हे शासनाच्या १४ वा वित्त व १५ वा वित्त आयोग या निधी मधून होते ही रक्कम शासनाकडून ग्रामपंचायतीला व ग्रामपंचायतीकडून ही रक्कम जिल्हा परिषद ला वर्ग केली जाते .त्यानंतर ती कंपनी ला जाते मागील पाच महिन्याची २ कोटी ५० लाख रुपये ही रक्कम वर्ग झाली आहे तरीदेखील पाच महिने झाले संगणक परिचालक लाॅकडॉन काळात मानधनावर काम करताहेत संगणक परिचालक पदवीधर असून देखील मानधन मिळाले नसल्याने शेतमजूर प्रमाणे काम करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे यामध्ये महिला वर्ग हि मोठ्या प्रमाणावर आहेत एकीकडे लॉकडाऊन नाही कंबरडे मोडले असताना दुसरीकडे थकीत मानधन त्यामुळे संगणक परिचालक आणि त्यांचे कुटुंब दुहेरी कात्रीत सापडले आहे ग्रामपंचायतीमधील संगणकीय काम ठप्प झाले असून याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे जोपर्यंत थकीत मानधन मिळणार नाही तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन असेच सुरू राहील वेळ आली तर जिल्हा परिषदेचे परिषदेसमोर तसेच विविध पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन करून एक महिना होऊन गेला तरी जिल्हा प्रशासनाने याबाबत बैठक किंवा चर्चा करण्यासाठी साधे निमंत्रण दिलेली नाही याउलट संगणक परिचालक यांना नोटीस काढून त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे हा संपत दडपण्याचा प्रयत्न चालू आहे तरी संगणक परिचालक मागील मागणीवर आपल्या मागणीवर ठाम आहेत अशी माहिती सांगली जिल्हा संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष किरण पाचोरे यांनी दिली हा संप अनधिकृत असून संपाचे अधिकृत निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे यावेळी कार्याध्यक्ष रणजित पाटील उपाध्यक्ष अनिकेत यादव शिराळा तालुका अध्यक्ष बापुसो पाटील, उपाध्यक्ष शेखर पोतदार, उर्मीला पाटील,मनोज खाडे, संदीप कांबळे, प्रदीप कांबळे ,संग्राम यादव उपस्थित होते.


  जो पर्यत्न मानधन मिळणार नाही तो पर्यन्त कोरोना व्यतिरीक्त  इतर कामबंद बेमुदत आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल.वेळ प्रसंगी जिल्हा परीषद व पंचायत समिती समोर ठिय्या आदोलन करु !!

  शेखर पोतदार शिराळा तालुका उपाध्यक्ष संगणक परीचालक संघटना.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .