उंडाळ्यात ऑक्सीजन बेडसह सुसज्ज असे कोरोना उपचार केंद्र सुरू करा , अन्यथा तीव्र आंदोलन करू.

 उंडाळ्यात ऑक्सीजन बेडसह सुसज्ज असे कोरोना उपचार केंद्र सुरू करा .

 "अन्यथा तीव्र आंदोलन करू.- उंडाळे  येथील ग्रामस्थांची मागणी."

' सामान्य नागरिकांच्यात कमालीचा असंतोष उद्रेक होण्याची दाट शक्यता.' 


उंडाळे - प्रतिनिधी (प्रदीप पाटील )

कोरोना चा वाढता विळखा लक्षात घेत व   कोविड बाधित रुग्णांना ऑक्सीजन बेड उपलब्ध होत नसल्याने  लोकांची परिस्थिती गंभीर होऊन काही लोकांचे मृत्यू होत आहे .तसेच खासगी रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च येत आहे .हा खर्च गोरगरीब लोकांना परवडत नाही ते कर्जबाजरी होता आहे .याचा विचार करून उंडाळे येथे 50 ऑक्सीजन बेडचे सुसज्ज असे कोविड केंद्र उभे करावे या मागणीचे निवेदन उंडाळे येथील सजग ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले .हातावर हात ठेवून उगाच इतर गोष्टीत प्रशासनाने वेळ न घालवता तात्काळ उंडाळ्यात या सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी या निवेदनात केली आहे .निवेदनावर गावातील 150 नागरिकांच्या सह्या आहेत.तरी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल न घेतल्यास आम्हाला आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेल .








Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .