शिराळा तालुक्यात जनता कर्फ्यूचा बोऱ्या .
शिराळा तालुक्यात जनता कर्फ्यूचा बोऱ्या .
"काही गावे वगळता सर्वत्र बाजारपेठा व रस्त्यांवर नियमित गर्दी "
शिराळा - प्रतिनिधी ( आनंदा सुतार )
शिराळा तालुक्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या जनता कर्फ्यूचा बोऱ्या वाजल्याचे चित्र आहे. काही गावे वगळता सर्वत्र बाजारपेठा व रस्त्यांवर नियमित गर्दी दिसत आहे.कोणतेही काम नसताना नागरिकांची रस्त्यावर रेलचेल सुरूच आहे. एकूणच प्रशासन लोकप्रतिनिधी, व्यापाऱ्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे जनता कर्फ्यूचा
फ्लॉप शो झाला आहे.
शेडगेवाडी बाजार पेठेतही काहीसा असाच प्रकार या जनता कर्फ्यू मध्ये दिसुन येत आहे ग्रामपंचायतीने ११सप्टेबर पासुन पुढील दहा दिवस बंद चेआवाहन करुन दंड आकारण्याची घोषणा केली होती मात्र ती तोंडीचअसल्याची चर्चा सुरु आहे.व्यापारी वर्गातुन बंदला अल्प प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा फक्त पाच दिवस बंद सांगण्यात आले तरीही बाजार पेठेत साखळी तोडण्यासाठी केलेल्या उपाय योजनांचा फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. स्थानिक व्यापारी दुकानच्या बाहेर बसुन ग्राहकांना मालाची विक्री करत आहेत पंरतु बंदचे आवाहन करणारे डोळे झाकुन न पाहील्याची भुमीका करत आहेत .
ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. दररोज रुग्ण जास्त संखेने सापडत आहेत. मृत्यूचेही प्रमाण सर्वाधिक आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड व उपचाराअभावी रुग्णांचे तडफडून मृत्यू सुरु आहेत. मृत्यू पश्चात अंत्यसंस्कारा करीता खोळंबा सुरु आहे. कोरोनाने हाहा:कार माजवला असताना प्रशासन मात्र यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहे. अशा परिस्थितीत हॉस्पिटल उभारणी, उपचाराची गरज असताना जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेचीच जबाबदारी म्हणत खबरदारीसाठी ‘जनता कर्फ्यूचे' आवाहन केले आहे. व्यापारी प्रशासन आणि जनता यांच्यात समन्वय नसल्याने तालुक्यात जनता कर्फ्यूचा पुरा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे.

Comments
Post a Comment