लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना स्थळावरील कोवीड केअर सेंटरचे लोकार्पण .

  लोकनेते बाळासाहेब देसाई  कारखाना स्थळावरील कोवीड केअर सेंटरचे लोकार्पण .

"50 ऑक्सिजन बेड- 25 नॉन ऑक्सिजन बेड- एकूण 75 बेडची सुविधा ."


कराड दि.20 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे.कराड, सातारा याठिकाणी ऑक्सिजन बेडची कमतरता जाणवू लागली आहे.ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे कोरोना बाधित व्यक्तींच्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे.अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्यातून कोवीड केअर सेंटर उभे करुन पाटण विधानसभा मतदारसंघातील कोरोना बाधितांना उपचार देणेकरीता आम्ही पुढाकार घेतला केवळ पाच ते सहा दिवसात हे कोरोना कोवीड सेंटर उभे करण्याचे काम केले असून येथे 50 ऑक्सिजन बेड,25 नॉन ऑक्सिजन बेड अशी एकूण 75 बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.आवश्यक असणारे 18 वैद्यकीय अधिकारी,17 कर्मचारी, औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. आजपासूनच हे सेंटर कोरोना रुग्णांना उपचाराकरीता खुले करण्यात आले आहे असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केलं


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .