महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सौ सारिका मंडले यांची निवड.

 महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सौ सारिका मंडले यांची निवड.


कराड - प्रतिनिधी ,

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सौ सारिका लक्ष्मण मंडले यांची नियुक्ती करण्यात आली. सदर ची नियुक्ती केंद्रीय कार्यकारिणी च्या माध्यमातून करण्यात आली या निवडी बद्दल त्यांचे लेखिका व कवयत्री संगीता येळवे व अॅड विठ्ठलराव येळवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळी बोलताना मंडले म्हणाल्या महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण करणे महिलांनी चूल आणि मूल या गोष्टी बाजूला ठेवून स्वतः बरोबर इतर महिलांचा देखील विकास करावा यासाठी माझे प्रयत्न राहतील आणि संघटना वाढी साठी चांगल्या व्यक्तींची निवड करून महिलांना सक्षम करण्याचे कार्य करणार आहे या निवडी बद्दल केंद्रीय अध्यक्ष मनोहरजी सुने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापु देशमुख केंद्रीय सचिव सुरेश सवळे महिला मंच च्या प्रदेशाध्यक्ष जयश्रीताई पडागडे सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते , शाखा अभियंता लक्ष्मण मंडले, पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे आदी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .