मा.आसिफ पटेल यांचा वाढदिवसाचा संकल्प पुर्ण.

 मा.आसिफ पटेल यांचा  वाढदिवसाचा संकल्प पुर्ण.

कराड - प्रतिनिधी, 

मुर्ती लहान पण किर्ती महान हे सिद्ध करूण दाखवनारे मानव कल्याणकारी संघटनेचे कराड तालुका युवक अध्यक्ष मा.आसिफ पटेल यांचा वाढदिवस वेगळ्याच पद्धतीने साजरे करण्यात आला. 2019 मध्ये वाढदिवसाला केलेला संकल्प जवळ जवळ पुर्ण करून तरूनांमध्ये वेगळाच आदर्श निर्माण करण्यात आला. आम्ही निराधार आश्रमाची सुरवात करू असा 2019 चा संकल्प होता. त्याच संकल्पा प्रमाणे काही काळात निराधार आश्रम लोकांच्या निदर्शणास येनार असल्याचे आणी पुढील वर्षी वाढदिवसा पर्यंत त्याचे काम पुर्ण करूण आश्रम चालु करण्याचा संकल्प आसिफ पटेल यांनी आखला आहे. तसेच वाढदिवस म्हणजे D.J, फटाके, हे आपण पहात असतो पण राज्याच्या विवीध भागात वाढदिवसा निमीत्त होणारे सामाजीक कार्यक्रम पाहुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सातारा, रत्नागीरी, वाई, कराड, मल्हारपेठ इत्यादि ठीकाणी अनेक कार्यकर्त्यांनी व लहान मुलांनी झाडे लावली, साफसफाई, धान्य-अन्न वाटप करूण, व पडझड झालेल्या घरांना ताडपत्री देऊन आपल्या लाडक्या अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. तसेच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मा.अंकुशराव कणसे, मा.शशांक नांगरे, सातारा जिल्हा युथ अध्यक्ष मा.नितीनभाऊ आवळे व 5 स्टार न्युज चे संपादक मा.एकनाथ कांबळे यांनी संकल्प पुर्ण करण्यास पुर्णता मदत करणार असल्याचे सांगीतले आहे.





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .