कडधान्य उत्पादक वा-यावर. सोया खरेदी व्यापारी बेभान. नागरी पुरवठा विभागाच्या कारवाईची प्रतिक्षा.

 कडधान्य उत्पादक  शेतकरी वा-यावर.

"सोया खरेदी व्यापारी बेभान."

नागरी पुरवठा विभागाच्या कारवाईची प्रतिक्षा.'


उंडाळे - प्रतिनिधी (प्रदिप पाटील)

    सध्या खरीप हंगामातील पिके व कडधान्यांची काढणी सुरु झाली आहे . जगात थैमान घातलेल्या कोरोनामुळे शेतकरी वर्ग अगोदरच मेटाकुटीला आल्याने , कामगार मिळत नसुन , निसर्गाच्या बेभरवशामुळे थोडेफार प्रमाणात मिळण्या-या उत्पनावर सध्या शेतकरी वर्गास गुजराण करावी लागणार आहे. त्यातच शेतीतुन निघणाऱ्या सोयाबीन, भुईमूग व इतर कडधान्यांच्या माध्यमातून आपला विस्कटलेला संसार संभाळण्यांच्या तयारीत असताना जगाचा पोंशिदा दिसत आहे, मात्र रक्ताचे पाणी करुन वाढवलेल्या शेत मालास योग्य भाव , काटामारी याच्यापासुन कसे वाचवावे हाच प्रश्न सध्या शेतकरी वर्गात दिसुन येत आहे.

  थोडे फार पैसे मिळावेत, यासाठी शेतकरी झटत असुन आधीच पाऊसांच्या मनमानी पणामुळे तर गत सहा महिन्यापासुन कोरोनाच्या थैमानामुळे हैराण, वेळेवर पिकाना न मिळालेल्या लागवडीने  यंदाच्या उत्पनामध्ये मोठी घट झाली आहे . त्यातच.. ओंड,उंडाळे परिसरातील कडधान्य व्यापा-यांची मनमानी करतांना दिसत असल्याचे शेतकऱ्यांमधुन बोलले जात आहे . त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टाचे लाखो रूपयांचा तोटा सहन करावा लागत असुन, अशा व्यापा-यांवर कोणाचाही निर्बंध राहीला नसुन हे व्यापरी बिनधाकपणे काळाबाजार करत आहेत . स्वतःच्या फायदासाठी शेतकऱ्यांच्या" टाळुवरचे लोणी खाणा-या या व्यापा-यांना रोखणार कोण, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिला आहे .

खरीप हंगामामध्ये शेतकरी प्रामुख्याने सोयाबीन , भुईमुग,भात,ज्वारी या पिकांबरोबर तुर,मुग,उडीद, सुर्यफुल,कारळा यासह कडधान्यांची पिके घेतली जातात. यंदा नअपेक्षित पाऊस  झाल्याने उत्पादनात बरीच घट झाली असुन निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच शेतकऱ्यांच्या तोंडच पाणी पळाले असुन  बहुतांश शेतकरी शेतात पिकलेल्या शेतमाल्याची विक्री करून त्यातुन येणाऱ्या पैशातुन आवासुन उभे राहिलेल्या संकटास तोंड देण्याचा प्रयत्न  करत आहे. 

  मात्र सध्या अलीकडे उटसुठ कोणीही कडधान्य खरेदी करण्याची दुकानदारी मांडण्याची स्पर्धाच ओंड, उंडाळे परिसरात दिसुन येते जागोजागी छोटी-मोठी दुकाने थाटल्याचे प्रामुख्याने पहावयास मिळत आहे. कराड ग्रामीण भागात मोठ्या संख्येने कडधान्य व्यापारी या व्यवसायात पदार्पण केल्याचे चित्र पहाण्यात येत आहे. कमी कालावधीत जास्त नफा मिळण्याचा धंदा म्हणुन या क्षेत्रात अभ्यास शुन्य व्यवसायिक दिसुन येताहेत.

  कडधान्य व्यापा-यांकडुन होणाऱ्या काटामारी,दरातील फसवेगीरीने ग्रहण लागले असुन सोयाबीन व अन्य कडधान्य खरेदी करताना ओंड,उंडाळे ग्रामीण परिसरातील व्यापारी वजन काट्यामध्ये फसवण्याबरोबर दर कमी जादा करून फसवण्यांच्या प्रमात वाढ झाल्याचे असल्याचे चित्र दिसत आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना काबाड कष्ट करुनही आर्थिक फटका सोसावा लागत आहे .  मात्र त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्याचे दिसुन येत आहे .

बहुतांश व्यापा-यांच्या कडुन इलेक्ट्रानीक वजन काट्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असुन या वजन काट्यामध्ये फेरफार होण्याची अनेक उदाहारणे आहेत . ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडाणी व अशिक्षीतपणाचा गैरफायदा ह्या व्यापा-यांच्या कडुन घेतला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे .


फँट मशिन आणि व्यापारी 


  कराड दक्षिण मधिल बहुतांश भागातील कडधान्य व्यापाऱ्यांनी कडधान्यातील अद्रकता पाहण्यासाठी'फँट मशिन'ची व्यवस्था केली असुन सदरील मशीन मार्फत सोयाबीन ओले आहेत का यांची पडताळणी केली जाते . त्याच्याबरोबर मालाची किंमत ठरवली जात असुन मात्र अद्रकता आणि दर याच्यात जाणूनबुजून तफावत दर्शवत संबंधित व्यापारी दरात २५ते ३०टक्के शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करत आहेत. साधारणता सोयाबीन ३७००प्रती क्लिंटल दर जरी असला तरीही मात्र काही व्यापारी २५००ते२७०० दरामध्ये सोयाबीन खरेदी करत शेतकऱ्यांची फसवणुक करत असुन सदरील व्यापाऱ्यांवर संबंधित प्रशासनाकडुन अशा व्यापाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडुन होत आहे.

काटेमारीबाबत हुशारी करण्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेची.


सोयाबीन व अन्य धान्यांची खरेदी करणारे व्यापारी संबंधित शेतकऱ्यांना बोलण्यात गुंतवतात,दरम्यान त्या व्यापा-यांकडील कामगार वजन करून पध्दतशीरपणे काटामारी करतात. त्यामुळे व्यापा-यांचा हेतु साध्य होतो. बहुतांश शेतकऱ्यांना "पट्टीच्या"काट्यातील काहीच कळत नसल्याने व्यापारी म्हणतील तेच वजन गृहीत धरतात. त्याच बरोबर इलेक्ट्रानीक काट्यामध्ये ही गडबड करून व्यापारी फसवणुक करत असल्यामुळे अशा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन संबधित दुकाने कायम स्वरुपी बंद करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनमधुन होत आहे.

कडधान्यांचे दरपत्रक, व दुकान परवाना  प्रत्येक दुकानात पाहीजे.

कोणतेही कडधान्य खरेदी करतांना हे व्यापारी दिवसातुन तीन ,चार वेळा दर बदलतांना दिसत असतात . त्याबाबत व्यापा-यांच्याकडे विचारणा केली असता , ते व्यापारी "वरूनच दर बदलत असल्याने आम्हाला ही दर बदलावे लागत असल्याचे सांगतांना दिसतात. मात्र ही सर्व व्यापा-यांचीच मनमानी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे . अशा व्यापा-यांवर कडक कारवाई करावी आणि संबंधित व्यापा-यांना आपल्या दुकानामध्ये दरपत्रकांची सक्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे . तसेच संबंधित व्यापाऱ्यांची नोंद शासनदरबारी असलेचा दुकानाचा परवाना त्याच्या दुकानात स्पष्टपणे लावलेला असावा , अशीही मागणी  नागरीकांच्यातून होत आहे.


नागरी पुरवठा विभागाची जागृती महत्वाची..

सोयाबीन फॅटच्या मशीनमधुनही शेतकऱ्यांच्या फसवणुक करण्यात येत असल्याच्या तक्रारी असुन व्यापा-यांकडील त्या मशीनची नागरी पुरवठा विभागामार्फत कराड दक्षिण मधील ग्रामीण भागातील कडधान्य खरेदी करण्या-या येणाऱ्या केंद्रावरुन सदरील व्यापारी वापरत असणारे वजन काट्याच्या तपासण्या लवकरात लवकर करण्यात यावा, त्याच बरोबर इलेक्ट्रानीक वजन काट्यामध्ये ही फेरफार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचीही तपासणी व्हाव्यात .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .