ऑलम्पिंकवीर स्व.पै.खाशाबा जाधव यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला पाहिजे
ऑलम्पिंकवीर स्व.पै.खाशाबा जाधव यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला पाहिजे.
'मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी यांचा जाहीर पाठिंबा.'
शिराळा - प्रतिनिधी (आनंदा सुतार)
भारत देशाला पहिलं वहिलं आॅलम्पिंक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे जिगरबाज मल्ल स्व.पै.खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार मिळावा यासाठी कुस्ती मल्लविद्या महासंघ व कुस्ती मल्लविद्या महासंघ प्रवक्ते पै.संग्राम कांबळे यांच्या वतीने जन आंदोलन उभारण्यात आले आहे.
स्व.पै.खाशाबा जाधव यांनी १९५२ साली भारत देशाला वैयक्तिक क्रिडा प्रकारात पहिलं पदक मिळवून दिलं. परंतु अशा इतिहासाची नोंद करणा-या जिगरबाज मल्लास शासन दरबारी घोर उपेक्षाच पदरी पडली. कोणतीच मदत अथवा पुरस्कारासाठी त्यांची दखल घेण्यात आली नाही हीच सल मनात धरून कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक पै.गणेश मानुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती मल्लविद्या महासंघ प्रवक्ते पै.संग्राम कांबळे यांनी हे जन आंदोलन उभा केले .
या आंदोलनास मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी यांनी जाहीर पाठिंबा दिला.
सदर कार्यक्रमास पै.संग्राम कांबळे , कुस्ती मल्लविद्या महासंघ राज्य उपाध्यक्ष पै.राहुल जाधव ,कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष आनंदराव पाटील, कुस्ती मल्लविद्या शिराळा तालुका प्रवक्ते विकास शिरसट , कुस्ती मल्लविद्या शिराळा तालुका पैलवान सहायता कक्ष प्रमुख पै.राहुल पाटील व तालमीतील सर्व नवोदीत मल्ल उपस्थित होते.

Comments
Post a Comment