पुनवत येथील जवानाचे त्रिपुरा येथे निधन

 पुनवत येथील जवानाचे त्रिपुरा येथे निधन.


शिराळा-  प्रतिनिधी

          पुनवत ता शिराळा येथील बीएसएफ चे जवान नानाश्री भगवान माने वय ३० यांचे त्रिपुरा राज्यातील आगरतळा येथे सेवा बजावत असताना अल्पशा आजाराने  सोमवार दि २८ रोजी निधन झाले .त्यांच्या निधनाने पुनवत गावावर शोककळा पसरली आहे .

          जवान नानाश्री माने हे बीएसएफ च्या १३३ बटालियन मध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते २००९ मध्ये त्यांनी या सेवेचा आरंभ केला होता .काही दिवसांपूर्वी ते गावी सुट्टीवर आले होते .   सोमवार दि २८ रोजी सकाळी ड्युटीवर असताना त्यांची तब्बेत अचानक बिघडली .त्यानंतर त्यांना मिल्ट्रीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले .मात्र उपचार सुरू असताना रात्री सव्वाआठच्या सुमारास त्यांचे निधन झाले अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. माने यांच्या पश्चात आई, पत्नी, लहान मुलगा, दोन बहिणी, चुलते असा परिवार आहे .त्यांच्यावर पुनवत ता.शिराळा येथे त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .