पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी कराड दक्षिण भाजपच्यावतीने राबवण्यात आले विविध सामाजिक उपक्रम.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी कराड दक्षिण भाजपच्यावतीने राबवण्यात आले विविध सामाजिक उपक्रम.
कराड - प्रतिनिधी (प्रदीप पाटील
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये दि.१४ ते २५ सप्टेबर या कालावधीमध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष पै.धनंजय पाटील, मलकापुर युवा मोर्चा शहर अध्यक्ष तानाजी देशमुख, धनाजी माने खुबीकर, किसान मोर्चा उपजिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, गोंदीचे उपसरपंच किशोर पवार, डि.एस.सोमदे, सुनिल शिंगाडे, यांच्यासह सरपंच ,उपसरपच,ग्रा.पं.सदस्य व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशामध्ये सेवा सप्ताहदिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. यावेळी सर्वञ सामाजिक उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्रप्रदेश कार्यकारिणी सदस्य डाॅ.अतुलबाबा भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेरे संजयनगर, गोंदी गावठाण, जुळेवाडी, मलकापुर, काले, रेठरे बुद्रुक,येणके,कोळे, येथे सार्वजनिक स्वच्छता अभियान, फळे वाटप, वृक्षारोपण,जेष्ठ नागरिकांना चेस्मे लाठी वाटप त्याचबरोबर आयुर्वेदीक काढा देण्याचे कार्य या सप्ताहामध्ये करण्यात येत आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत जाधव,सर्जेराव मदने,मलकापुर नगरसेवक आबासो सोळवंडे, सचिन पवार, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष डाॅ.सारिका गावडे, स्वाती थोरात, अंजली रैनाक,सुनंदा शेळके, शुभांगी कांबळे, अशोक पवार, प्रकाश कुंभार, सुर्यकांत खिलारे, संतोष हिंगसे, प्रमोद शिंदे, यांनी सहभाग घेतला.
वृक्षारोपन करताना पै.धनंजय पाटील,तानाजी देशमुख,धनाजी माने,सुनिल शिंदे,व इतर.


Comments
Post a Comment